T20 WC INDW vs ENGW : स्मृतीचे झुंजार अर्धशतक, रिचाचीही दमदार खेळी मात्र भारताचा पराभव

T20 World Cup  INDW vs ENGW LIVE
T20 World Cup INDW vs ENGW LIVEesakal

INDW vs ENGW LIVE : आयसीसी टी 20 महिला वर्ल्डकप 2023 मधील आजच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव करत आपले ग्रुपमधील पहिले स्थान अबाधित राखले. भारताने 20 षटकात 5 बाद 140 धावा करत झुंज दिली. स्मृती मानधनाने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिची घोषने 47 धावा करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला.

तत्पूर्वी, महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत रोखले. भारताकडून वेगावान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने भेदक मारा करत 15 धावात 5 बळी टिपले. इंग्लंडकडून नॅट सिवर ब्रंटने 50 तर एमी जोनेसने 27 चेंडूत 40 धावा केल्या.

INDW 121/5 (19) : रिचा झुंजली 

स्मृती बाद झाल्यानंतर रिचा घोषने शेवटपर्यंत सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला. मात्र सामना 6 चेंडूत 31 धावा असा अवघड आला होता.

105-4 (16 Ov) : स्मृतीचे झुंजार अर्धशतक मात्र...

जेमिमाह रॉड्रिग्जने 13 धावा करून स्मृतीची साथ सोडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 4 धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने रिचा घोषच्या साथीने भारताला शंभरी पार करून दिली. दरम्यान, स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर ती लगेच बाद झाली.

40-1 (6 Ov) : स्मृतीची फटकेबाजी

स्मृती मानधनाने पॉवर प्लेमध्ये दमदार फलंदाजी करत भारताला 40 धावांपर्यंत पोहचवले. यात स्मृतीचा वाटा हा 25 धावांचा होता.

29-1 : भारताला पहिला धक्का 

भारताने दमदार सुरूवात केल्यानंतर इंग्लंडच्या कॅथरिन ब्रंटने शफाली वर्माला 8 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का बसला.

INDW 27/0 (3) : भारताची दमदार सुरूवात 

इंग्लंडचे 152 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी 3 षटकात 27 धावा चोपल्या. यात स्मृतीच्या 18 धावांचे मोठे योगदान आहे.

120-5 : दिप्तीने दिला दिलासा 

दिप्ती शर्माने अर्धशतक ठोकणाऱ्या नॅट सिवर ब्रेंटला बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

80-4 : शिखा पांडेने फोडली जोडी

इंग्लंडची अवस्था 3 बाद 29 धावा झाल्यानंतर हेथर नाईट आणि नॅट सिवर यांनी डाव सावरत 51 धावांची आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचली. यामुळे इंग्लंड 11 व्या षटकात 80 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ही जोडी शिखा पांडेने फोडली. तिने हेथर नाईटला 28 धावांवर बाद केले.

 29-3  : रेणुका सिंहने उडवली इंग्लंडची टॉप ऑर्डर 

रेणुका सिंहने इंग्लंडची अवस्था 2 बाद 10 धावा अशी केली होती. त्यानंतर सोफी डंक्ले आणि नॅट सिवर ब्रंटने डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली होती. मात्र रेणुका सिंहने सोफी डंक्लेला 10 धावांवर बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला.

10-2 : इंग्लंडला दिले दोन धक्के

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पॉवर प्लेमध्येच भारताने दोन धक्के दिले. वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने डॅनी वॅटला शून्यावर तर एलिस कॅप्सेला 3 धावांवर बाद केले.

भारताने नाणेफेक जिंकली. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने एक बदल केला आहे. देविकाच्या जागी शिखा पांडेला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ अव्वल स्थानासाठी भिडणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com