esakal | शफालीचं अर्धशतक हुकलं; पण तिने 'त्या' एका ओव्हरमध्ये जिंकलं!
sakal

बोलून बातमी शोधा

Shafali Verma

शफालीचं अर्धशतक हुकलं; पण तिने 'त्या' एका ओव्हरमध्ये जिंकलं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड महिला संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लिश कर्णधार हेथर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाची सलामीच्या जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 70 धावा केल्या. पहिल्या टी-20 सामन्यात शून्यावर बाद करणाऱ्या ब्रंटचा शफालीनं यावेळी चांगलाच समाचार घेतला. ब्रंट घेऊन आलेल्या चौथ्या षटकात शफालीने सलग पाच चौकार खेचले. या षटकात स्मृती मानधनाने एकेरी धाव घेत शफालीला स्टाईक दिले. त्यानंतर शफालीनं पुढच्या 5 चेंडूत 20 धावा कुटल्या. (England Women vs India Women 2nd T20I Shafali Verma smashes five fours in a overs)

हेही वाचा: Wimbledon Final : बेरेट्टिनी-जोकोविच यांच्यात सुरुय तगडी फाईट!

पहिल्या टी-20 सामन्यात ब्रंटने शफालीला दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केले होते. त्याचा वचपाच या ओव्हरमध्ये शफालीनं काढला. सुरुवातीपासूनच शफालीनं आक्रम पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. ती मोठी खेळी साकारणार असे दिसत असताना मॅडीने तिला बाद केले. ती 48 धावांवर झेलबाद होऊन परतली. तिच्या पाठोपाठ स्मृती मानधनानेही एक मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट फेकली.

हेही वाचा: 'फॅमिली मॅन'! मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल

भारतीय महिला संघाला पहिल्या टी-20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार, 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयासह इंग्लिश महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील असेल. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात शफालीनं लक्षवेधी खेळी केली होती. पहिल्या डावात 96 आणि दुसऱ्या डावात 63 धावा तिने केल्याचे पाहायला मिळाले. पण वनडे मालिकेत तिला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मितालीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वनडे मालिकेत 3-1 असा पराभव झाला. त्यामुळे टी-20 मालिका जिंकून इंग्लंड विरुद्ध बरोबरी करण्याचेही भारतीय महिला संघासमोर चॅलेंज आहे.

loading image