esakal | Wimbledon Final : बेरेट्टिनीनं पहिला सेट जिंकला; पण..
sakal

बोलून बातमी शोधा

Matteo Berrettini vs Novak Djokovic

Wimbledon Final : बेरेट्टिनीनं पहिला सेट जिंकला; पण..

sakal_logo
By
सुशांत जाधव

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला सर्बियाचा नोवोक जोकोविच आणि सातव्या मानांकित इटलीचा मॅट्टेओ बेरेट्टिनी यांच्यात विम्बल्डन जेतेपदासाठी लढत होत आहे. दोघांच्यात पहिल्या सेटपासूनच तगडी फाईट पाहायला मिळते. सुरुवातीला जोकोविचने 4-2 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बेरेट्टिनी 6-6 बरोबरी करुन चुरस आणखी वाढवली. टाय ब्रेकरमध्ये मॅट्टेओ बेरेट्टिनी पहिला सेटही जिंकला. पण अनुभवी जोकोविचनं पुन्हा कमबॅक करत त्याचे इरादे उधळून लावले.

जोकोविचसाठी फायनल जिंकून नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या 20 वेळा ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरला होता. दुसरीकडे मागील 45 वर्षांच्या इतिहासात इटलीचा एखादा खेळाडू ग्रँडस्लॅम फायनल खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. 1976 मध्ये अँड्रियानो पेनेटा यांनी फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मॅट्टेओ बेरेट्टिनी याने फायनलपर्यंत धडक मारली होती. (Wimbledon 2021 Final Novak Djokovic vs Matteo Berrettini Record And Final Result)

हेही वाचा: Euro 2020 Final : कोणता संघ ठरणार युरोचा हिरो?

या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंतची ही तिसरी लढत होती. यापूर्वी ज्या दोन लढती झाल्या त्यात 19 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा नोवोक जोकोविचनेच बाजी मारली होती. मॅट्टेओ बेरेट्टिनीला 2-0 हा रेकॉर्ड बदलण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आले. जोकोविचने यात आणखी एका विजयाची नोंद करत रेकॉर्ड 3-0 असे केले. दोघांच्यातील शेवटची लढत नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये रंगली होती. यात जोकोविचने क्वार्टर फायनलमध्येच बेरेट्टिनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सध्याच्या घडीला जोकोविच जबरदस्त फॉर्ममध्ये असून मॅट्टेओ बेरेट्टिनीला त्याला रोखणं जमलं नाही. पहिला सेट जिंकूनही बेरेट्टिनीला आपल्या पहिल्या वहिल्या विम्बल्डन फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

loading image