esakal | INDWvsENGW: स्नेह राणासह पदार्पणात दीप्तीचीही हवा!
sakal

बोलून बातमी शोधा

India Women Team

INDWvsENGW: स्नेह राणासह पदार्पणात दीप्तीचीही हवा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

England Women vs India Women Test Day 1 : सात वर्षानंतर कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघात आज पाच जणींनी कसोटीत पदार्पण केले. दिप्ती शर्मा, शफाली वर्मा, पूजा वस्त्राकर, विकेट किपर तानिया भाटियासह स्नेह राणाचा यात समावेश आहे. स्नेह राणा हे नवा जरी नवे वाटत असले आणि ती पहिला कसोटी सामना खेळत असली तरी भारतीय महिला संघाचे तिने यापूर्वीच प्रतिनिधीत्व केले आहे. 19 जानेवारी 2014 मध्ये स्नेह राणा हिने पहिला वनडे सामना खेळला होता. टी-20 पदार्पणही तिने आठवड्याभरात केले. मात्र त्यानंतर तब्बल पाच वर्षे ती टीम इंडियातून बाहेर होती. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची तिला संधी मिळाली. आणि आपल्या कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यात तिने संधीच सोनं करुन दाखवलं. (England Women vs India Women Test Day 1 Sneh Rana Deepti Sharma Pooja Vastrakar Indian debutants Contribution 1 st Day)

हेही वाचा: भारतीय महिला संघ भारीच; कसोटीत विक्रमी चौकाराची संधी

पाच वर्षांनी कमबॅक करणाऱ्या स्हेन राणाचे दमदार कमबॅक

पहिल्या दिवशीच्या खेळात स्नेह राणाने भारतीय संघाकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडची सलामीची फलंदाज टॅमी ब्यूमॉन्ट 66 (144), अ‍ॅमी एलेन जोन्स 1 (9) आणि जॉर्जिया एल्विस 5 (11) या तिघींना तिने तंबूचा रस्ता दाखवला. स्नेह राणा हिने 29 ओव्हर्समध्ये 77 धावा खर्च करुन तीन विकेट्स मिळवल्या. यात तिने चार ओव्हर मेडन टाकल्या.

दीप्ती शर्मानेही घेतल्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स

दीप्ती शर्माने 18 ओव्हरमध्ये 50 धावा खर्च करत कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटला तिने शतकाच्या उंबरठ्यावर तंबूत धाडले. इंग्लंडच्या कर्णधाराने 175 चेंडूत 95 धावांची खेळी केली. दिप्तीने तिला पायचित केले. तिच्याशिवाय नताली सायव्हरच्या 42 (75) रुपात तिने दुसरे यश मिळवले. पदार्पणाच्या सामन्यात पूजा वस्त्रारकर हिने देखील एक विकेट घेतली.

हेही वाचा: WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय

पहिल्या दिवसाचा खेळ

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिग करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवशी 6 बाद 269 धावा केल्या. यात कर्णधार हेदर नाइट 95, टॅमी ब्यूमॉन्ट 66, नताली सायव्हर 42 आणि लॉरेन विनफिल्ड हिल हिच्या 35 धावांचा समावेश आहे.

loading image