मानसिकरित्या कणखर होण्यासाठी क्रिकेटला ब्रेक; स्टोक्सचा मोठा निर्णय

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
Ben Stokes
Ben Stokes File Photo

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. 4 ऑगस्टपासून इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी बेन स्टोक्सने क्रिकेटच्या मैदानातून दूर विचार केलाय. शुक्रवारी रात्री उशीराने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या आगामी मालिकेतून माघार घेतल्याचे सांगितले. (Englands Ben Stokes take an indefinite break from all forms of cricket prioritise mental wellbeing)

Ben Stokes
एक पावलावर पदक; गोल्डसाठी 'या' तिघींना दाखवावा लागेल इंगा

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या प्रमुख संघातील ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचा नवा संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. दुखापतीतून सावरणाऱ्या बेन स्टोक्सने या मालिकेतून कमबॅक केले होते. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानला पराभूतही केले होते. त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. सध्याच्या घडीला तो मानसिक आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे सांगत त्याने क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

Ben Stokes
Olympics Medal Tally : यजमानांची घसरण, जाणून घ्या भारताचे स्थान

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या निवेदनानुसार, बेन स्टोक्सने सर्व क्रिकेट प्रकारातून ब्रेक अनिश्चितकाळासाठी ब्रेक घेतलाय. स्टोक्स मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि दुखापतीवर उपचार घेण्याठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातूनही माघार घेतली आहे. आम्ही त्याला आवश्यक ती मदत करण्यासाठी बांधील आहोत, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आलाय. इंग्लंड बोर्डाचे अध्यक्ष एश्ले जाइल्स म्हणाले की, बेन स्टोक्सने आपल्या मनातील भावना खुलेपणाने बोलून दाखवणे हे धाडसाचे आहे. 16 महिन्यांपासूनचा काळ खूप कठिण आहे. या काळात मर्यादित स्वातंत्र्यात कुटुंबियांपासून दूर रहाण्याचे मोठे आव्हान खेळाडूंसमोर उभे राहिले आहे. त्याला आवश्यक वाटेत तोपर्यंत त्याने विश्रांती घ्यावी. तो लवकर इंग्लंड संघात परतेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com