प्रीमिअर लीगमध्ये खेळाडू-स्टाफ मेंबर्ससह 40 जणांना कोरोना

Premier League
Premier League

Premier League प्रीमिअर लीग मधील 40 खेळाडूंचे Covid 19 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. आठवड्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. मागील आठवड़्यात दोन टप्प्यात कोरोना चाचणी घेण्यात आली होती.   नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून 171 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊन लीग आयोजकांनी प्रत्येक खेळाडूच्या आठवड्यातून दोन चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

ज्या खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना 10 दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव उघड केलेले नाही. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान 28 खेळाडूंचे कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असे प्रीमिअर लीगने आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान 984 जणांच्या  चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यात खेळाडूंसह स्टाफ सदस्यांचाही समावेश होता. यातील 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  

लंडनच्या पश्चिम भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील आठवड्यात बर्नले आणि टोटेनहम हॉटस्पर यांच्यातील सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मँचेस्टर सिटी आणि एव्हर्टन यांच्यातील सामनाही रद्द करण्यात आला होता.  यूकेमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2.7 मिलियनच्या घरात पोहचला आहे. 75000 अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळेही याठिकाणी एकच खळबळ माजली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सनन यांनी देशात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी इंग्लिश प्रिमियर लिग सुरु ठेवण्याला परवानगी देण्यात आली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com