नाईटॉन 18 वर्षाच्या धावपटूचा डोळा उसेन बोल्टच्या वर्ल्ड रेकॉर्डवर

Erriyon Knighton the 18-year old Sprinter Set To Break Usain Bolt World Record
Erriyon Knighton the 18-year old Sprinter Set To Break Usain Bolt World Recordesakal

ट्रॅक अँड फिल्डमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून उसेन बोल्टने (Usain Bolt) आपला दबदबा निर्माण केला आहे. तो निवृत्त झाल्यानंतर ट्रॅक अँड फिल्ड क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र आता ही पोकळी भरून काढण्यासाठी अमेरिकेचा 18 वर्षाचा एरियोन नाईटॉन (Erriyon Knighton) सरसावला आहे. तो जुलै - ऑगस्ट दरम्यान ऑरेगॉनमध्ये होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टचे वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) तोडण्याचा जोरदार प्रयत्न करेल. जवळपास महिन्यापूर्वी झालेल्या एका स्पर्धेत नाईटॉन 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत 19.49 सेकंद इतकी वेळ नोंदवली. त्याने 20 वर्षाखालील स्वतःच्याच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुधारणा केली. त्यामुळे त्याची तुलना उसेन बोल्टबरोबर करण्यात येत आहे.

18 व्या वर्षी उसेन बोल्ट किती वेगात धावायचा?

उसेन बोल्टने 20 वर्षाखालील 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 19.93 सेकंद वेळ नोंदवत वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. मात्र नाईटॉनने हे रेकॉर्ड गेल्या जून महिन्यात झालेल्या युएस ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत मोडले. नाईटने पहिल्या फेरीत 19.88 सेकंद वेळ नोंदवली त्यानंतर फायनलमध्ये 19.84 इतकी वेळ नोंदवली. त्यानंतर त्याची टोकियो ऑलिम्पिक संघात निवड झाली. मात्र टोकियो आलिम्पिकमध्ये तो 20.55 सेकंद अशी वेळ नोंदवत चौथ्या स्थानावर शर्यत पूर्ण केली.

100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचा विचार केला तर बोल्टने 20 व्या वर्षी 10.03 सेकंद ही त्याची वैयक्तिक सर्वात चांगली कामगिरी होती. तर दुसरीकडे नाईटॉनने 18 व्या वर्षी 100 मीटर शर्यत 10.4 सेकंदात पूर्ण केली आहे. याचबरोबर गेल्या मे महिन्यात त्याने 100 मीटर शर्यतीत 9.99 सेकंद इतकी वेळ नोंदवली. बोल्ट प्रमाणेच नाईटॉन सध्या तरी 200 मीटर शर्यतीला प्राधान्य देत आहे. मात्र जसजशी त्याच्यात प्रगती होत जाईल तसतसा तो 100 मीटर शर्यतीकडे वळाला तर आश्चर्य वाटायला नको.

सध्या नाईटॉन यंदाच्या हंगामात आपली वेळ 10 सेकंदाच्या आत आणण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. तो यासाठी 28 मे ला होणाऱ्या प्रेफॉन्टाईन क्लासिक मीटमध्ये जोर लावणार आहे. जर तो 10 सेकंदाच्या आत आपली शर्यत पूर्ण करू शकला तर हे त्याच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीतील वर्ल्ड रेकॉर्ड ज्याच्या नावावर त्या उसेन बोल्टला देखील वयाच्या 18 व्या वर्षी 200 आणि 100 मीटर शर्यतीत 20 आणि 10 सेकंदाच्या आतली वेळ नोंदवता आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com