Euro 2020 ENG vs DEN Prediction :इतिहास इंग्लंडच्या बाजूने

एरिक्सनसाठी सारे काहीं या टॅगलाईनने खेळणाऱ्या डेन्मार्कचे प्रशिक्षक कॅस्पर हिजुलमंन्ड कोणते डावपेच खेळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
England vs Denmark
England vs Denmark Twitter
Updated on

तब्बल चौदा वर्षांनी उपात्यंफेरीत पोहचलेला इंग्लंड डेन्मार्कला नमवून पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचेल, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांची आहे. कारण गेली काही दशके देशात व्यावसायिक फुटबॉलमध्ये मानदंड ठरणारे संघ असुनही इग्लंडच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्मरणीय कामगिरी करता आलेली नाही. (Euro 2020 England vs Denmark 2 nd semi final prediction)

त्यामुळे बलाढ्य जर्मनीला पराभूत केल्यानंतर या संघाला आकाश ठेंगणे झाले आहे. यापूर्वी दोनदा उपात्यं फेरीतील पराभवाचा दुष्काळ संपविण्याची संधी इंग्लडचा प्रशिक्षक ग्रेथ साऊथगेट आणि कर्णधार हॅरी केन या जोडगोळीला आहे. तर संघ सहकारी एरिक्सनला फायनलची भेट देण्यासाठी डेन्मार्क झपाटल्याने रंगतदार लढत होईल.

England vs Denmark
Copa : गोलीची हिरोगिरी! मेस्सीची अर्जेंटिना फायनलमध्ये (VIDEO)

दुसरीकडे बलाढ्य जर्मनीला धुळ चारणारा इंग्लडचा संघ चांगलाच बहरात आला आहे. जर्मनी, युक्रेन विरूध्द मिळालेला सफाईदार विजयामुळे प्रशिक्षक ग्रेथ साऊटगेट आणि कर्णधार हॅरी केन यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. विशेषतः अनुभवी हॅरी आणि आघाडीपटू स्टर्लिंग यांच्यातील कमालीचा समन्वय निर्णायक ठरतो आहे. गोलरक्षक जॉर्डन फिकफोर्ड, बचावपटूंनी चिवट खेळ करत अद्याप गोलजाळी अभेद्य ठेवली आहे. मुख्यतः भक्कम बेंच स्टेंथ जमेची बाजू आहे. त्यामुळेच फायनलची संधी सोडायची नाही या उद्देशाने इग्लंड सर्वस्वपणाला लावेल यात शंका नाही.

England vs Denmark
इटलीनं गाठली फायनल; स्पेनचा हिरो पेनल्टी शूट आउटमध्ये ठरला व्हिलन!

तुलनेत एरिक्सनच्या अनपेक्षित एक्झिटमुळे डेन्मार्क सैरभैर झाला. पाठोपाठ दोन सामन्यात पराभवामुळे खाईत लोटला गेला. भरवशाचा खेळाडू एरिक्सनकडून प्रेरणा घेत माजी विजेत्या डेन्मार्कने गटसाखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवित भरारी घेतली. झेक रिपब्लिक, वेल्स संघावर केलेली मात त्यांना उपात्यं फेरीत पोहचवण्यासाठी सहाय्यक ठरली. अव्वल संघाशी अद्याप मुकाबला न झाल्याने माजी विजेत्या डेन्मार्कचा इग्लंडविरुध्द खऱ्या अर्थाने कस लागेल. कौशल्यपुर्ण आघाडीफळी, मध्यरक्षकावरच संघाची मदार आहे. दोन संघातील 21लढतींत इंग्लडने 12 विजय नोंदविल्याने इतिहासही इंग्लडच्या बाजूने आहे. त्यामुळे एरिक्सनसाठी सारे काहीं या टॅगलाईनने खेळणाऱ्या डेन्मार्कचे प्रशिक्षक कॅस्पर हिजुलमंन्ड कोणते डावपेच खेळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com