esakal | Euro 2020 : ट्रॉफी गोज टू रोम! गोलीनं लिहिली चॅम्पियन्सची स्क्रिप्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Italy

Euro 2020 : ट्रॉफी गोज टू रोम! गोलीनं लिहिली चॅम्पियन्सची स्क्रिप्ट

sakal_logo
By
सुशांत जाधव

युरो कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये इटलीने जवळपास पाच दशकांची प्रतिक्षा संपुष्टात आणत दुसऱ्यांदा ट्रॉफी पटकावली. युरोच्या इतिहासात 1976 नंतर दुसऱ्या फायनलचा निकाल हा पेनल्टी शूट आऊटमध्ये लागला.1976 मध्ये चेक प्रजासत्ताकचा संघ पेनल्टी शूट आउटमध्ये वेस्ट जर्मनीला पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत करून चॅम्पियन ठरला होता. युरोच्या इतिहासातील सर्वात जलद गोल डागत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या मिनिटाला आघाडी घेतली होती. पहिल्या हाफमधील दुसऱ्या मिनिटाला ल्युक शॉने इंग्लंडसाठी पहिला गोल डागला. सामना सुरु झाल्यानंतर 1 मिनिट आणि 57 सेकंदातील हा गोल युरोच्या इतिहासातील सर्वात जलद गोल ठरला. लंडनमधील वेम्बलेच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने 1-0 अशी आघाडी कायम राखली. (EURO 2020 Final Italy beats England 3 2 in penalties)

हेही वाचा: ENG W vs IND W : अटितटीच्या लढतीत भारतीय महिलांनी मारली बाजी

दुसऱ्या हाफमध्ये लिओनार्डो बोनसीने इटलीच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. त्याने 67 व्या मिनिटाला स्कोअर 1-1 बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्ये सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये गेला. यात इंग्लंडने एक पेनल्टी मिस केली तर इटलीचा गोली जियानलुगी डोन्नरम्मा दोन पेनल्टी रोखून दाखवत इटलीच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्या दोन मिनिटात झालेल्या गोलमुळे इंग्लंडची 55 वर्षांच्या प्रतिक्षा संपणार असे वाटत होते. पण पेनल्टीमध्ये 'ट्रॉफी गोज रोम... नॉट होम' असे चित्र पाहायला मिळाले. यापूर्वी 1966 मध्ये इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकही मोठी स्पर्धा इंग्लंडला जिंकता आलेली नाही. घरच्या मैदानावरही इंग्लंडला मोठ्या स्पर्धेतील फायनलमधील दुष्काळ कायम राहिला.

पेनल्टीचा थरार

  • इटलीकडून डी बेराडीनं पहिली किक यशस्वीपणे गोलमध्ये रुपांतरित केली

  • इंग्लंडकडून कर्णधार हॅरी केनने 1-1 बरोबरीचा गोल डागला

  • इटलीकडून ए बेलाट्टीने संधी गमावली आणि इंग्लंडला आगेकूच करण्याची संधी निर्माण झाली

  • एच मार्गुरेनं गोलीला चकवा देत इंग्लंडला 2-1 अशी आघाडी मिळवूनही दिली

  • लिओनार्डो बोनसी याने यशस्वी किक मारत इटलीला पुन्हा 2-2 असे बरोबरीत आणले

  • इंग्लंडच्या तिसऱ्या गड्याने खेळ बदलला, रेशफोर्डने गोलीला चकवले पण तोही चकला त्याला गोलपोस्टमध्ये चेंडू डागता आला नाही आणि इंग्लंडची धगधग वाढली स्कोअर 2-2 बरोबरीत असा होता

  • एफ बेर्नाडसी याने लेफ्ट-राईट न करता सरळ मध्यभागी लक्ष्य करत यशस्वी किक मारली आणि इटलीला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.

  • इंग्लंडचा सांचो आणि बी साका या दोघांचे प्रयत्न इटलीचा गोल किपर जियानलुगी डोन्नरम्मा याने हाणून पाडत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला

loading image