esakal | Euro 2020 : इंग्लंडच्या पराभवानंतर राडा घालणाऱ्या 49 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Euro 2020

Euro 2020 : इंग्लंडच्या पराभवानंतर राडा घालणाऱ्या 49 जणांना अटक

sakal_logo
By
सुशांत जाधव

लंडन : युरो 2020 च्या फायनल लढतीत प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडच्या संघाला घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या संघाने पेनल्टी शूट आउटमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर वेम्बलेच्या स्टेडियमवर चाहत्यांनी एकच हंगाम केल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियम बाहेर प्रेक्षकांनी केलेला राडा नियंत्रणात आणण्यासाठी लंडन मेट्रोपोलिटियन दंगा नियंत्रण पोलिस दलाला रस्त्यावर उतरावे लागले. बळाचा वापर करुन पोलिसांना गर्दीला पांगवले. (Euro 2020 final Metropolitan Police arrested 49 people for variety of offences)

स्टेडियम परिसराशिवाय स्थानिक पोलिसांनी पिकाडिली सकर्स आणि लिचेस्टर स्क्वायर भागातील फुटबॉल चाहत्यांनाही नियंत्रित करण्याची कसरत करावी लागली. याभागात इंग्लंड संघाचे चाहते वीजेच्या खांबवर चढले होते तर काहींनी बसच्या टपावर चडून धिंगाणा घातला होता.

हेही वाचा: पराभव नाही पचवता आला, इंग्लिश चाहत्यांचा इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला

मेट्रोपोलिटियन पुलिसांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, ‘ आम्ही युरो 2020 फायनल लढतीच्या पार्श्वभूमीवर अभियान चालवले. ज्या हजारो समर्थकांनी जबाबादारीने सामन्याचा आनंद घेतला, त्यांचे धन्यवाद! ज्यांनी नियम तोडल्या अशा 49 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गर्दीला नियंत्रणात आणताना 19 पोलिस अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आलीये. लढतीनंतर शहरातील बिघडलेला माहोल नियंत्रणात आणण्यासाठी रात्रभर शहराची सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचेही पोलिस विभागाने आभार मानले आहे.

हेही वाचा: Euro 2020 : ट्रॉफी गोज टू रोम! गोलीनं लिहिली चॅम्पियन्सची स्क्रिप्ट

वेम्बलेच्या स्टेडियमवर चाहत्यांनी धिंगाणा केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. बॅरिकेट्स तोडून चाहत्यांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले होते. विना तिकीट स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काहींनी दंगा केल्याचे पाहायला मिळाले होते.

loading image