esakal | Euro : पोर्तुगाल vs बेल्जियम; जाणून घ्या नॉक आउटचे वेळापत्रक
sakal

बोलून बातमी शोधा

Portugal vs belgium

Euro : पोर्तुगाल vs बेल्जियम; जाणून घ्या नॉक आउटचे वेळापत्रक

sakal_logo
By
सुशांत जाधव

EURO 2020 Portugal vs France : युरो कप स्पर्धेतील साखळी सामन्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर 6 ग्रुपमधील 12 संघ निश्चित झाले आहेत. फ्रान्सविरुद्धची लढत बरोबरीत रोखल्यानंतर पोर्तुगालने डेथ ग्रुप समजल्या जाणाऱ्या ग्रुप F मध्ये तिसऱ्या स्थानावर राहुन देखील अखेरच्या 16 मध्ये स्थान मिळवले आहे. A गटातून इटली-वेल्स. B गटातून बेल्जियम-डेन्मार्क, C गटातून नेदरलंड-ऑस्ट्रिया, D गटातून इंग्लंड-क्रोएशिया, E गटातून स्वीडन-स्पेन तर डेथ ग्रुप समजल्या जाणाऱ्या F ग्रुपमधून फ्रान्स-जर्मनी या बारा संघांनी आपापल्या गटात टॉप दोनमध्ये राहुन स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवली. (EURO Cup 2020 Round of 16 draw Portugal Met Belgium See All Schedule)

हेही वाचा: EURO: फ्रान्स-जर्मनीसह पोर्तुगालच्या आशा कायम

सर्व ग्रुपमधील मिळून चार संघाना देखील खेरच्या 16 मध्ये संधी मिळणार आहे. साखळी फेरीतील फ्रान्स विरुद्धच्या अखेरच्या लढत 2-2 अशी बरोबरीत राखत पोर्तुगालने आपल्या खात्यात चार गुण जमा केले आहेत. याच्या जोरावर रोनाल्डोच्या पोर्तुगालनेही अखेरच्या 16 संघात स्थान मिळवले आहे. त्यांची लढत फिफा वर्ल्ड नंबर वन रँकिंग असलेल्या बेल्जियमविरुद्ध होणार आहे. D ग्रुपमध्ये 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेक प्रजासत्ताकनेही अखेरच्या 16 मध्ये स्थान मिळवले असून त्यांचा सामना हा नेदरलंड विरुद्ध रंगणार आहे. उर्वरित दोन संघ गुणांच्या सरासरी आणि एकंदरीत कामगिरीच्या जोरावर निवडले जातील. या दोन संघासमोर इंग्लंड आणि स्वीडनचे आव्हान असेल.

हेही वाचा: WTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!

नॉक आउट राउंडचे वेळापत्रक

26 जून 2021 वेल्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 वाजता

27 जून 2021 इटली विरुद्ध ऑस्ट्रिया मध्य रात्री 12.30 वाजता

27 जून 2021 नेदरलंड विरुद्ध चेक प्रजासत्ताक रात्री 9.30 वाजता

28 जून 2021 बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल मध्यरात्री 12.30 वाजता

28 जून 2021 क्रोएशिया विरुद्ध स्पेन रात्री 9.30 वाजता

29 जून 2021 फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड मध्यरात्री 12.30 वाजता

29 जून 2021 इंग्लंड विरुद्ध TBA रात्री 9.30 वाजता

30 जून 2021 स्वीडन विरुद्ध TBA 12.30 वाजता

loading image