Euro Cup 2024 : स्पेनची घोडदौड रोखण्याचे फ्रान्ससमोर आव्हान; पहिल्या उपांत्य लढतीत संघर्ष अपेक्षित

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीपासून विजयी धडाका राखलेल्या आक्रमक शैलीच्या स्पेनची घोडदौड रोखण्याचे खडतर आव्हान फ्रान्ससमोर आहे. स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत जोरदार संघर्ष अपेक्षित असेल.
Euro Cup 2024 challenge for France to win over Spain clash expected in first semi-final
Euro Cup 2024 challenge for France to win over Spain clash expected in first semi-finalSakal

म्युनिक : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीपासून विजयी धडाका राखलेल्या आक्रमक शैलीच्या स्पेनची घोडदौड रोखण्याचे खडतर आव्हान फ्रान्ससमोर आहे. स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत जोरदार संघर्ष अपेक्षित असेल.

लुईस दे ला फ्युएन्टे यांच्या मार्गदर्शनाखालील स्पॅनिश संघाने उपांत्य लढतीपर्यंतच्या वाटचालीत पाचही सामने जिंकले आहेत. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी यजमान जर्मनीचा २-१ फरकाने पाडाव केला. दुसरीकडे, दिदए देशॉ यांच्या मार्गदर्शनाखालील फ्रेंच संघही अपराजित आहे; पण त्यांनी निर्धारित वेळेत दोन सामने जिंकले असून त्यांच्या तीन लढती बरोबरीत राहिल्या.

उपांत्यपूर्व फेरीत गोलशून्य बरोबरीनंतर त्यांनी पोर्तुगालचा अडसर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ फरकाने दूर केला. पाचपैकी चार लढतीत एकही गोल स्वीकारलेला (क्लीन शीट) नाही ही बाब फ्रान्ससाठी जमेची आहे. साहजिकच फ्रान्सचा भक्कम बचाव विरुद्ध स्पेनचे धारदार आक्रमण अशी लढत रंगू शकते.

Euro Cup 2024 challenge for France to win over Spain clash expected in first semi-final
Euro 2024 : इंग्लंडची पेनल्टींवर बाजी! स्वित्झर्लंडविरुद्ध विजयात गोलरक्षक पिकफोर्ड अभेद्य

तीन वेळच्या माजी विजेत्या स्पेनला महत्त्वाच्या उपांत्य लढतीत दोघा प्रमुख बचावपटूंना मुकावे लागत आहे. निलंबनामुळे डॅनी कार्वाहाल व रॉबिन ले नॉर्मन फ्रान्सविरुद्ध खेळणार नाही. मागील लढतीत जर्मनीविरुद्ध युवा मध्यरक्षक पेद्री जायबंदी झाला होता, तो फ्रान्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. जर्मनीविरुद्ध बदली खेळाडू डॅनी ओल्मो याने पेद्री याची अनुपस्थिती जाणवू दिली नव्हती. स्पेनचे युवा विंगर्स निको विल्यम्स व लामिन यमाल यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ केला आहे.

स्पर्धेत स्पेनने एकूण ११ गोल नोंदविले आहेत, तुलनेत फ्रान्सचे आक्रमण विशेष प्रभावी ठरलेले नाही. त्यांनी फक्त तीनच गोल नोंदविले असून त्यापैकी दोन प्रतिस्पर्ध्यांचे स्वयंगोल आहे. ऑस्ट्रियाविरुद्ध नाकाला दुखापत झाल्यानंतर कर्णधार किलियन एम्बाप्पे नाकावरील मास्कसह खेळत आहे; परंतु त्याला सूर गवसलेला नाही आणि आक्रमणातील अपयश फ्रान्सची चिंता वाढविणारे आहे.

स्पेन परतफेड करणार?

यापूर्वीच्या प्रमुख स्पर्धेत १० ऑक्टोबर २०२१ रोजी मिलान येथे यूईएफए नेशन्स लीगच्या अंतिम लढतीत स्पेन व फ्रान्स यांच्यात गाठ पडली होती. तेव्हा किलियन एम्बाप्पे याने ८०व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे फ्रान्सने २-१ विजयासह करंडक पटकावला होता. आता युरो करंडकाच्या उपांत्य लढतीत स्पॅनिश संघ त्या पराभवाचा वचवा काढणार का, याची उत्सुकता आहे.

माझ्यासाठी यश खूप मेहनत आणि समर्पणाचे असले तरी वाटचाल, कार्य, निष्ठा, प्रयत्न, त्याग यातही यश असते. तुम्ही सर्वकाही दिलेत, तर तुम्ही कदापि अपयशी होणार नाहीत.

-लुईस दे ला फ्युएन्टे, स्पेनचे प्रशिक्षक

जरी लोकांनी आमच्याकडून येथपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा बाळगलेली असली, तरी आम्ही उपांत्यफेरी गाठली ही एक उपलब्धी आहे. सर्वकाही परिपूर्णपणे झालेले नसले, तरी माझ्या खेळाडूंसाठी ही अभिमानाची बाब आहे. मला या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे.

-दिदिए देशॉ, फ्रान्सचे प्रशिक्षक

Euro Cup 2024 challenge for France to win over Spain clash expected in first semi-final
Copa America : अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत? कॅनडाची आज अग्निपरीक्षा

उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल

स्पेन ब गट साखळी फेरी वि. वि. क्रोएशिया ३-०, वि. वि. इटली १-०, वि. वि. अल्बानिया १-०, राऊंड ऑफ १६ फेरी वि. वि. जॉर्जिया ४-१, उपांत्यपूर्व फेरी वि. वि. जर्मनी २-१.

फ्रान्स ड गट साखळी फेरी वि. वि. ऑस्ट्रिया १-०, बरोबरी वि. नेदरलँड्स ०-०, बरोबरी वि. पोलंड १-१, राऊंड ऑफ १६ फेरी वि. वि. बेल्जियम १-०, उपांत्यपूर्व फेरी बरोबरी वि. पोर्तुगाल ०-०, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्स ५-३ सरस

दृष्टिक्षेपात

- स्पेन व फ्रान्स यांच्यांत आतापर्यंत ३६ लढती

- स्पेन १६, तर फ्रान्स १३ सामन्यांत विजय, ७ बरोबरी

- स्पेन सहाव्यांदा उपांत्यफेरीत, यापूर्वी चार विजय व एक पराभव

- फ्रान्सची सहावी उपांत्य फेरी, याअगोदर तीन विजय व दोन पराभव

- युरो करंडकात स्पेनला तीन वेळा (१९६४, २००८, २०१२) विजेतेपद

- फ्रान्स दोन वेळा (१९८४, २०००) युरो करंडक विजेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com