नव्या जबाबदारीने उत्साह वाढला : के. एल. राहुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नव्या जबाबदारीने उत्साह वाढला : के. एल. राहुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर : भारतीय संघाचा उपकप्तान म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे, ज्याने माझा उत्साह वाढला आहे. संघात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि सर्वोत्तम कामगिरी करायला ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले असेल, असा कर्णधार रोहित आणि माझा प्रयत्न असेल, असे मत के. एल. राहुलने व्यक्त केले. दोन दिवसांनंतर न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका सुरू होत आहे. त्याबावत राहुल बोलत होता.

दिल्लीतील प्रदूषणाचा जयपूरला त्रास जाणवतो आहे का, असे विचारता राहुल म्हणाला, आम्ही पत्रकारांशी बोलून झाल्यावर मैदानात उतरणार आहोत, तेव्हा अजून कल्पना येत नाहीये. हवा तशी ठीक वाटत आहे जयपूरची, असे सांगताना हार्दिक बद्दल चालू असलेल्या बाकी चर्चाची आपल्याला कल्पना नाही. कारण वर्ल्डकपनंतर त्याच्याशी बोलणे झालेले नाही, असे के. एल. राहुल म्हणाला. स्वतःच्या पुढे नेहमी संघाला ठेवायचे, त्यांनी साधी मागणी केली आहे, असेही राहुल म्हणाला.

हेही वाचा: T20 WC: एक आफ्रिदी दुसऱ्या आफ्रिदीवर संतापला, म्हणाला...

नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम भारतीय संघ सुरू करत असताना कप्तानही नवा आहे. वर्ल्डकपला वेळ आहे. ते दूरचे ध्येय आहे. आम्हाला तयारीवर लक्ष देणे आवडेल. छोटी पावले टाकण्यावर भर दिला जाईल, असेही के. एल. राहुल म्हणाला. जाता जाता रोहित शर्मा कमाल फलंदाजावरोवर सक्षम कप्तान आहे, असेही त्याने सांगितले.

loading image
go to top