Shahid Afridi Angry | T20 World Cup : एक आफ्रिदी दुसऱ्या आफ्रिदीवर संतापला, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid-Afridi-Shaheen-Shah-Afridi

शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवरच ऑस्ट्रेलियाने कुटल्या विजयी धावा

T20 WC: एक आफ्रिदी दुसऱ्या आफ्रिदीवर संतापला, म्हणाला...

sakal_logo
By
विराज भागवत

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले आणि फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. हे आव्हान ६ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने पूर्ण केले. सामन्याच्या १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा झेल सुटला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत १८ धावांची आवश्यकता होती. शाहीन आफ्रिदीच्या वेगवान माऱ्याचा चलाखीने वापर करत वेडने पुढील तीन चेंडूंवर तीन षटकार मारले आणि सामना जिंकून टाकला. यावरून माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर टीका केली.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मी नाराज आहे. हसनी अलीने झेल सोडला हे खरं आहे. पण त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत १८ धावा हव्या होत्या. अशा वेळी इतकी वाईट प्रतीची गोलंदाजी करणं बरोबर नाही. तू संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहेस आणि तुला तीन चेंडूवर तीन षटकार मारले जातात ही बाब चिंतेची आहे. शाहीनच्या गोलंदाजीला चांगला वेग आहे. त्या वेगाचा विवेकपूर्वक वापर करणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. कॅच सोडला असला तरीही शाहीनने स्वत:चं डोकं वापरायला हवं होतं", असं रोखठोक मत शाहिद आफ्रिदीने व्यक्त केलं.

shahid afridi

shahid afridi

हेही वाचा: विराटनंतर रोहितला कर्णधार केल्याबद्दल आफ्रिदी म्हणाला...

"शाहिन शाह आफ्रिदीकडे चांगला वेग आहे. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेला त्याच वेगाने यॉकरचा मारा केला असता तर फलंदाजाला तसे फटके खेळणं कठीण गेलं असतं. कारण शाहिन शाह आफ्रिदीला कोणताही फलंदाज तीन चेंडूत तीन षटकार सहज मारू शकत नाही. त्यावेळी जर शाहीन शाह आफ्रिदीने डोकं वापरलं असतं तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता", असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.

Shaheen Afridi

Shaheen Afridi

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

loading image
go to top