Yuzvendra Chahal divorce| एका ट्विटने क्रिकेटरच्या आयुष्यात आणले घटस्फोटाचे वादळ, पण.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

एका ट्विटने क्रिकेटरच्या आयुष्यात आणले घटस्फोटाचे वादळ, पण....

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आल्याच्या बातम्या येत आहेत. दोघाच्याही घटस्फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, दोघांनी सोशलवर पोस्ट करत या अफवा असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या या घटस्फोटाची इतक्यावरच थांबलेली नाही. ही अफवा नेमकी कोणी उठवली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच एक व्हायरल होणारे फेक ट्विट समोर आले आहे.(Fact Check Yuvjendra Chahal Dhanashree Verma divorce Fake Accounts)

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील संबंध तुटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. चहलने त्याच्या इंस्टा स्टोरीवर न्यू लाईफ लोडिंग असा मॅसेज पोस्ट केला होता, त्याचवेळी धनश्रीने तिच्या इंस्टा अकाऊंटवरील 'चहल' हे आडनाव काढून टाकल्याने चाहत्यांचा गोंधळ उडाला.

हेही वाचा: Yuzvendra Chahal: पत्नी धनश्रीशी काडीमोड?चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

त्यात एएनआय या वृत्तसंस्थेचा लोगो असलेल्या ट्विटरवरून चहल व धनश्री यांनी पंजाब कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. आणि घटस्फोटाच्या चर्चाले उधाण आलं. पण, हे ट्विट फेक असल्याचे समोर आले आहे. एएनआयच्या अधिकृत ट्विटर हँडरवरून याबाबत स्पष्टिकरण देण्यात आले आहे.

फॅक्ट चेक

चहल पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेणार असल्याचे एएनआयचे ट्विट व्हायरल झाले. पण हे अकाऊंट फेक असल्याचे समोर आले आहे. अकाऊंटवर युजर आयडी @coffee_dot_com, @nikhilsmp97 आणि @guinessworld1 आहेत. तर न्यूज एजन्सीचा यूजर आयडी @ANI आहे. इतकेच नाही तर हे यूजर आयडी @ANI असलेले अकाऊंट व्हेरिफायदेखील आहे.

हेही वाचा: Yuzvendra Chahal : चहलची बायको देणार घटस्फोट? इंस्टावरुन नाव केलं डिलीट अन्...

याशिवाय एएनआयने स्क्रीन शॉटही शेअर केला आणि आपल्या फॉलोअर्सला सांगितले की चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाचा दावा करणारे ट्विटर अकाउंट बनावट आहे. तसेच, कृपया लक्षात घ्या की एएनआयची ही खोटी अकाऊट्स आहेत. अशी कोणतीही बातमी फ्लॅश झालेली नाही.

घटस्फोटाच्या चर्चेनंतर चहल काय म्हणाला....

'सर्वांना एक कळकळीची विनंती आमच्या नात्यासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता हे सगळ संपवा. प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाश.'

२२ डिसेंबर २०२०मध्ये चहल व धनश्री लग्न बंधनात अडकले आणि त्यानंतर धनश्री प्रत्येक क्रिकेट सामन्यात चहलला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित दिसली. मात्र, आता या दोघांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे आणि अशात एका ट्विटने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे.

Web Title: Fact Check Yuvjendra Chahal Dhanashree Verma Divorce Fake Accounts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..