esakal | ‘त्या’ धडकेनंतर ड्यूप्लेसिसला ‘मेमरी लॉस’चा त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ धडकेनंतर ड्यूप्लेसिसला ‘मेमरी लॉस’चा त्रास

‘त्या’ धडकेनंतर ड्यूप्लेसिसला ‘मेमरी लॉस’चा त्रास

sakal_logo
By
नामदेव कुंभार

उंच झेल घेण्याच्या प्रयत्नात फाफ ड्यूप्लेसिस आणि मोहम्मद हासन यांची जोरदार टक्कर झाली. त्यात ड्यूप्लेसिस जखमी झाला होता. पाकिस्तान प्रिमियम लीगमधील एका सामन्यात ही घटना घडली होती. यानंतर ड्यूप्लेसिसने मैदान सोडलं होतं, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता प्रकृती ठणठणीत असल्याचं ट्विट ड्यूप्लेसिसने केलं आहे. तसेच त्या धडकेनंतर मेमरी लॉसचा त्रास झाल्याचं ड्यूप्लेसिसने सांगितलं आहे.

ड्यूप्लेसिसनं काय केलं ट्विट?

रुग्णालयातून हॉटेलमध्ये परतल्यानंतर ड्यूप्लेसिसनं आपल्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणाला की, “सर्वांनी मेसेज पाठवून विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. मी हॉटेलमध्ये परतलो असून माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. या धडकेमुळे काही प्रमाणात माझ्या स्मृतीवर परिणाम (मेमरी लॉस) झाला आहे. मात्र सध्या प्रकृती उत्तम आहे. मी लवकरच मैदानात परतेल. खूप सारं प्रेम,”

पाकिस्तान प्रिमीयर लीगमधील एका सामन्यात मोहम्मद नवाज याचा चेंडू डेव्हिड मिलर यांनं उंचावरुन मारला. लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करणारा ड्यूप्लेसिस आणि लाँग ऑफला असलेला हसन चेंडू आडवण्यासाठी धावले. ड्यूप्लेसिससोबत धडक होईल, असं वाटल्यानंतर हसन थांबला मात्र खूप वेळ निधून गेली होती. दोघांची जोरदार धडक झाली. चेंडू रोखण्यासाठी झेपावलेल्या ड्युप्लेसिसचे डोके हासनच्या गुडघ्यावर लागले.

पाहा व्हिडिओ -

या जोरदार धडकेनंतर ड्युप्लेसिसला वेदना अनावर झाल्या. काहीवेळ त्यानं हालचालही केली नाही. त्याच्यावर मैदानावरच उपचार करण्यात आले. तो सहकऱ्यांच्या मदतीनं मैदानाबाहेर आला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ड्युप्लेसिसची प्रकृती उत्तम आहे.

loading image