अंपायरच्या चुकीमुळे धोनी झाला रनआऊट?

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर 18 धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चीत केले. 240 धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांपर्यंत मजल मारु शकला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली.

मँचेस्टर : यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी धावबाद झाला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. यामुळे न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. पण, धोनी धावबाद झाला, तो चेंडू नोबॉल असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पंचांच्या चुकीमुळे धोनी धावबाद झाल्याचे व्हायरल झाले आहे.

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर 18 धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चीत केले. 240 धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांपर्यंत मजल मारु शकला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली.

या सामन्यात धोनी धावबाद झाला हे दुर्दैवी मानली जात आहे. मार्टीन गप्टीलने चेंडू थेट फेकत धोनीला माघारी धाडले. मात्र याआधी मैदानावरील पंचांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या एका चुकीकडे डोळेझाक केल्याची चर्चा सुरु आहे. फर्ग्युसन टाकत असलेलं षटके हे पॉवरप्लेचं षटके होते. आयसीसीच्या नियमांनुसार पॉवरप्लेमध्ये पाचपेक्षा जास्त क्षेत्ररक्षक हे मर्यादीत सर्कलच्या बाहेर उभे राहू शकत नाही. असं झाल्यास तो चेंडू नो-बॉल ठरवण्यात येतो. मात्र धोनी फलंदाजी करत असताना फर्ग्यसुनच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचे सहा क्षेत्ररक्षक मर्यादीत सर्कलच्या बाहेर असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fans Livid as Umpiring Error May Have Cost Dhoni His Wicket and India the Semi-fina