esakal | स्ट्रेट ड्राइव्ह मारुनही सोशल मीडियावर सचिनची 'विकेट'
sakal

बोलून बातमी शोधा

farm laws, sachin tendulkar, netizens troll tendulkar

एका नेटकऱ्यांना एका किर्तनाचा दाखला देत तुझ्या धावा मोजण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बापाच्या औताच्या फेऱ्या मोजल्या असत्या तर बरं झालं असते, हे उदाहरण आता पटलं, असा टोला लगावला आहे.

स्ट्रेट ड्राइव्ह मारुनही सोशल मीडियावर सचिनची 'विकेट'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कृषी कायद्याच्या मुद्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावरुन शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या समर्थनानंतर #IndiaTogether असा हॅशटॅग सुरु झाला आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून खेळाडू पॉप स्टार गायिका रिहाना आणि ग्रेटा थनबर्गला प्रत्युत्तर देत आहेत. आमच्या देशातील अंतर्गत मुद्दा आम्ही सोडवू. बाहेरच्यांनी यात नाक खूपसण्याची गरज नाही, असा सूर उमटू लागला आहे. एका बाजूला सामाजिक स्तरातून रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला लोकप्रिय क्रिकेटर्संनी  या वादात उडी घेतली आहे. 

भारतीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाहीत. बाहेरची (परदेशी) लोक ते पाहू शकतात. पण त्याचा हिस्सा होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारतातील समस्यांची जाण आहे. आम्ही निर्णय घेण्यास सक्षम आहोत. एक देश म्हणून आम्ही एकजूट आहोत, अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे.

यावरून आता सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात येत आहे. तुला शेतकऱ्यांविषयी काय कळते? कंगना रणावत देशाविरोधात बोलली तेव्हा तू गप्प का होतास? असा  प्रश्न एका नेटकऱ्याने सचिन तेंडुलकरला विचारला आहे.  दुसऱ्या एका नेटकऱ्यांना एका किर्तनाचा दाखला देत तुझ्या धावा मोजण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बापाच्या औताच्या फेऱ्या मोजल्या असत्या तर बरं झालं असते, हे उदाहरण आता पटलं, असा टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांचा प्रचार केला तेव्हा सार्वभौमत्वाला बाधाला आली नव्हती का? असा प्रश्न उपस्थितीत करत सचिनला ट्रोल केले आहे.