10-12 वर्षे तणावात गेली; सचिनने अनेक रात्री जागून काढल्या

आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील मानसिक तणावाचा दाखला देत परिस्थितीनुसार गोष्टींचा स्विकार करुन लढाई जिंकावी, लागते, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkargoogel

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील जवळपास निम्मी वर्षे तणावात घालवली. मानसिक तणाव हा मॅचपूर्वी खेळाच्या तयारीचा भाग असल्याचे समजून घेत तो या फेजमधून बाहेर पडला. खुद्द सचिनने एका कार्यक्रमामध्ये यासंदर्भात खुलासा केलाय. कोविड-19 दरम्यान बायो-बबलमध्ये अधिक वेळ घालवणे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. याविषयावर भाष्य करताना आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील मानसिक तणावाचा दाखला देत परिस्थितीनुसार गोष्टींचा स्विकार करुन लढाई जिंकावी, लागते, असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

Sachin Tendulkar
आधी घरातच कोरोना टेस्ट, मग मुंबईत एकत्र जमणार

तेंडुलकरने ‘अनअकेडमी’ द्वारा आयोजित चर्चासत्रात भाग घेतला होता. यावेळी तो म्हणाला की, खेळासाठी शारीरिक तयारीसोबत मानसिक तयारीची गरज असते. जसजसे खेळत गलो तस तसे या गोष्टी मला समजू लागल्या. मैदानात उतरण्यापूर्वी माझ्या डोक्यात मॅच सुरु झालेली असायची. त्यावेळी मी खूप तणावात असोयचो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच शतक करुन विश्वविक्रम प्रस्थापित करणारा सचिन म्हणाला की, मी 10-12 वर्ष तणावासा सामना केला. मॅचपूर्वी अनेकदा मला रात्रभर झोप लागायची नाही. ही गोष्ट माझ्या तयारीचा एक भाग असल्याचे स्विकार करुन खेळत राहिलो, असे सचिन म्हणाला. तणावातून मोकळे होण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करायचो. एक दिवस आधी बॅग पॅक करणे. फलंदाजीचा सराव, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम व्यतिरिक्त चहा तयार करणे अशा गोष्टी करुन तणावापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करायचो, असेही सचिने म्हटले आहे.

Sachin Tendulkar
याला म्हणतात जोश; 91 व्या वर्षी पॅड बांधून उतरणार मैदानात

चहा तयार करणे, कपड्यांना इस्त्री करणे ही कामे मॅचच्या तयारीसाठी उपयुक्त ठरायची. या गोष्टी मला भावाने शिकवल्या होत्या. भारताकडून शेवटचा सामना खेळलो त्या सामन्यातही मी या गोष्टी फॉलो केल्या होत्या, अशी आठवणही त्याने सांगितली. प्रत्येकाला अडचणींचा सामना करावाच लागतो. आपल्या विरोधात घडणाऱ्या गोष्टींचा स्विकार केला तर गोष्टी सोप्या होतात. केवळ खेळाडूनेच नाही तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. जर तुम्ही गोष्ट स्विकारली तर त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही तयार होता, असा मंत्रही सचिनने यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com