Virat Kohli : वेड्या फॅनची वेडी ही माया... विराट अन् फॅनचा तो किसिंग Video तुफान व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Female Fan Kiss Virat Kohli Viral Video

Virat Kohli : वेड्या फॅनची वेडी ही माया... विराट अन् फॅनचा तो किसिंग Video तुफान व्हायरल

Female Fan Kiss Virat Kohli Viral Video : विराट कोहली हा सध्याच्या भारतीय संघातील सर्वात यशस्वी फलंदाज आहेच याचबरोबर तो संघातील सर्वात आवडचा आणि फॅनबेस असलेला खेळाडू देखील आहे. विराट कोहल हँड्सम क्रिकेटर असल्याने तो महिला फॅन्समध्ये तर तुफान लोकप्रीय आहे. जरी त्याचे अनुष्का शर्मासोबत लग्न झाले असले तरी त्याच्यासाठी आजही महिला फॅन्स वेड्या आहेत. अशाच एका वेड्या फॅन्सची वेडी माया अनुभवायाला मिळाली. या चाहतीचा विराट कोहलीसोबचा एक किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत विराट कोहलीची एक जबरा फॅन दिल्ली येथील मदाम तुसाद म्युजियममध्ये विराट कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओत तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे  या रमँटिक गाणं वाजत आहे. त्यावर ही विराटची चाहती विराट कोहलीच्या पुतळ्याला किस करतना दिसत आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा तुफान पाऊस पडत आहे.

भारताची रनमशीन आता पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये आली असून आटलेला शतकांचा रतीब पुन्हा सुरू झाला आहे. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात विराट कोहलीने 44 धावांची चांगली खेळी केली होती.

विराट कोहलीने आपला तीन वर्षाचा बॅडपॅच मागे टाकत टी 20 आणि वनडे सामन्यात शतकी खेळी केली. मात्र त्याला कसोटीतलं आपलं शतकांच मिटर पुन्हा सुरू करता आलेलं नाही. चाहते त्याच्या कसोटी शतकाची वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध अजून दोन कसोटी सामने आहेत त्यामुळे विराट या दोन सामन्यात नक्की आपला कसोटी शतकांचा दुष्काळ संपवेल अशी आशा आहे.

Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!