दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटलींच नाव!

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे फिरोज शाह कोटला स्टेडियमला भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे फिरोज शाह कोटला स्टेडियमला भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे.

शनिवार (ता.24) त्यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम 12 सप्टेंबरला  होणार आहे. यावेळी या स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये होणार असून याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची उपस्थिती असणार आहे.  

जेटलींनी फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये जास्त चाहत्यांना पुरावी अशी जागा तयार करण्यासाठी परवानगी दिली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feroj Shah Kotla Stadium to be renamed as Arun Jaitley Stadium by DDCA