

FIDE World Championship 2024: भारताचा युवा स्टार डी. गुकेश व गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यामधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील पाचव्या फेरीतही दोन्ही खेळाडूंना ड्रॉ अर्थातच बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंमध्ये २.५-२.५ अशी बरोबरी कायम आहे. मागील दोन फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडू सावध खेळ करीत असल्याचे जाणवत आहे.