

FIDE World Championship D Gukesh vs Ding Liren: गतविजेता चीनचा डिंग लिरेन व भारताचा युवा स्टार डी. गुकेश यांच्यामध्ये जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीतील सहाव्या फेरीतही ड्रॉ अर्थातच बरोबरी झाली. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी तीन गुण आहेत.
सोमवारी विश्रांतीचा दिवस असणार असून मंगळवारी सातव्या फेरीची लढत होणार आहे. या फेरीमध्ये गुकेश पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार आहे.