FIDE Women’s World Chess Championship tiebreak match: महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय खेळाडू कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होत असल्याने जेतेपदाची ट्रॉफी प्रथमच आपल्याकडे येईल हे निश्चित आहे. दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीच्या दोन सामन्यांत १-१ अशी बरोबरी मिळवल्याने टाय ब्रेकरमध्ये मॅच गेली अन् पहिला टायब्रेकरही बरोबरीत सुटला. पांढऱ्या मोहऱ्यांसह हंपीकडे दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये वर्चस्व असेल असे वाटले होते, परंतु दिव्याने सर्वांना अचंबित करणाऱ्या चाली खेळल्या. वेळेचं गणित बसवताना हंपीला तारेवरची कसरत करावी लागली. दिव्याने बाजी मारताना तिचा पहिला वर्ल्ड कप उंचावला...