FIDE World Cup Goa 2025: फिडे विश्वकरंडकाचा भारतात जल्लोष! भारतीय बुद्धिमत्ता आणि संस्कृतीचा जागतिक पटावर गौरवसोहळा
India Hosts FIDE World Cup Chess Tournament After 23 Years: फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा गोव्यात; २३ वर्षांनंतर भारत पुन्हा यजमान. डॉ. मनसुख मांडविय यांनी भारताच्या बुद्धिमत्तेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला.
पणजी : फिडे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद म्हणजे भारतीय बुद्धिमत्ता, संयम आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव महोत्सव असल्याचे मत केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी शुक्रवारी व्यक्त केले.