

sakal
नवी दिल्ली : पुढील महिन्यात दोहा येथे होणाऱ्या वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) पोषाखाबाबत शिथिलता दाखवली आणि नवा ड्रेस कोड जाहीर केला. गेल्या वर्षी याच स्पर्धेत मॅग्नस कार्लसनच्या ‘जीन्सगेट’ वादानंतर या वेळी पुरुष आणि महिलांना आक्षेपार्ह नसलेल्या जीन्स परिधान करण्यास परवानगी दिली आहे.