
२०३४ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे आयोजन सौदी अरेबिया करणार असल्याची घोषणा फिफा या फुटबॉल संघटनेने केली आहे. याशिवाय २०३० फिफा विश्वचषकही जाहीर झाला आहे. २०३० च्या विश्वचषकाचे आयोजन स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को यांनी संयुक्तपणे केले आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी ही घोषणा केली.