FIFA Bans AIFF : AIFF च्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, उद्या होणार सुनावणी

भारतीय फुटबॉल महासंघाच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
FIFA Bans AIFF
FIFA Bans AIFF
Updated on

Supreme Court to Hear FIFA Case : आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित केले. भारतीय फुटबॉल महासंघाच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी करण्याची विनंती केली. मेहता यांनी कोर्टाला सर्व अपडेट्स सांगितले, त्यावर कोर्टाने सुनावणी घेण्याचे मान्य केले.

ऑगस्टच्या सुरुवातीस फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल AIFF ला निलंबनाचा इशारा दिला. त्यानंतर आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट केले. यामध्ये FIFA कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावासाठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे नमुद केले आहे. फिफाने यासोबतच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा हक्क काढून घेण्याची धमकीही दिली. सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफला निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा देण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून, 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

FIFA Bans AIFF
FIFA Suspends AIFF : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ निलंबित

11 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता अंडर17 महिला फुटबॉल विश्वकप

17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. त्याच्या यशस्वी होस्टिंगसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तरदायित्व पत्रावर स्वाक्षरी करून आधीच मान्यता दिली होती. मात्र, आता फिफाच्या बंदीमुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारा आगामी FIFA U-17 महिला विश्वचषक पुढे ढकलला जाणार आहे.

स्पर्धेचे भवितव्य योग्य वेळी ठरवले जाईल आणि गरज भासल्यास हे प्रकरण ब्युरो ऑफ कौन्सिलकडे पाठवले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. तसेच आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकणार नसल्याचेही फिफाने स्पष्ट केले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com