FIFA Qualifiers : बचावपटू संदेश झिंगन दुखापतीमुळे बाहेर

विश्‍वकरंडक पात्रता फेरीसाठी भारतीय संभाव्य खेळाडूंची घोषणा
fifa cup 2026 qualifiers round defender Sandesh Jhingan is out due to injury
fifa cup 2026 qualifiers round defender Sandesh Jhingan is out due to injurySakal

नवी दिल्ली : फिफा विश्‍वकरंडक (२०२६) पात्रता फेरीसाठी भारतीय फुटबॉल संघातील संभाव्य खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्याकडून मंगळवारी करण्यात आली. अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याची दुखापतीमुळे भारताच्या संभाव्य संघात निवड करण्यात आलेली नाही.

राष्ट्रीय शिबिरासाठी भारतातील एकूण ४१ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. १० मेपासून सुरू होत असलेल्या शिबिरात २६ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर १५ मेपासून सुरू असलेल्या शिबिरासाठी १५ खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा अ गटात समावेश असून ६ जून व ११ जून यादरम्यान पात्रता फेरीच्या उर्वरित खेळावयाच्या आहेत. भारतीय संघासमोर आता कुवेत व कतार संघाचे आव्हान असणार आहे. या दोन महत्त्वाच्या लढतींसाठी भारतीय संघ सज्ज होत आहे.

भारतीय फुटबॉल संघ (१५ मेपासूनच्या शिबिरासाठी) : गोलरक्षक : फुर्बा तेम्पा लाचेम्पा, विशाल केथ. बचावपटू : आकाश मिश्रा, अन्वर अली, मेहताब सिंग, राहुल भेके, सुभाशिष बोस. मधली फळी : अनिरुद्ध थापा, दीपक तांगरी, एल. राल्टे, एल. छांगटे, लिस्टन कोलॅको, साहल अब्दुल समद. आक्रमक फळी : मन्वीर सिंग, विक्रम प्रताप सिंग.

भारतीय संघाच्या उर्वरित लढती

६ जून - कुवेत, कोलकता

११ जून - कतार, अल रयान

अ गटातील गुणतालिका

१) कतार - ४ सामने १२ गुण

२) भारत - ४ सामने ४ गुण

३) अफगाणिस्तान - ४ सामने ४ गुण

४) कुवेत - ४ सामने ३ गुण

अव्वल दोन संघ आगेकूच करणार

पात्रता फेरीअखेर गटामध्ये अव्वल दोन स्थानावर असलेले संघ फिफा विश्‍वकरंडकच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करणार आहेत. तसेच या संघांना २०२७मधील आशियाई करंडकाचीही पात्रताही मिळवता येणार आहे. सध्या भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे; पण या गटातील एकूण चार लढती बाकी असून यामधील दोन लढती भारतीय संघाच्या असणार आहेत. ११ जूननंतर या गटातील चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com