FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी! : Argentina vs France Final | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Argentina vs France FIFA World Cup 2022 Final

FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी!

Argentina vs France FIFA World Cup 2022 Final : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉलचा थरार अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. विजेत्याची ट्रॉफी स्टेडियम मध्ये पोहोचली असून, त्यासाठी आज दोन्ही संघ भिडणार आहेत. या ट्रॉफीशिवाय विजेत्या संघाला कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का विजेत्या संघाला खोटी ट्रॉफी दिली जाते.

हेही वाचा: WTC Points Table : टीम इंडिया फायनलच्या दिशेने मात्र 'या' संघाकडून धोका; जाणून घ्या समीकरण

अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली, तर उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केला. शनिवारी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना झाला, ज्यामध्ये क्रोएशियाने मोरोक्कोवर २-१ ने मात केली. आज जेतेपदाच्या लढतीत फ्रान्स आणि अर्जेंटिना आमनेसामने आहेत. सामना रात्री भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता सुरू होईल. पण त्याआधी जाणून घ्या की विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती पैसे मिळतात.

शेवटचा विश्वचषक 2018 मध्ये खेळला गेला होता. त्यात फ्रान्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले होते. बक्षीस म्हणून त्याला 38 दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते मात्र यावेळी त्यात 4 दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्यात आली आहे. 2022 मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाला $42 दशलक्ष बक्षीस रक्कम दिली जाईल. भारतीय चलनात अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.

हेही वाचा: Ind vs Ban 1st Test: कुलदीप 20 महिन्यानंतर परतला अन् केली कमाल! अक्षरची लाभली साथ

विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी

ट्रॉफीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फिफा विश्वचषक विजेत्या संघालाही खरी ट्रॉफी दिली जात नाही, तर सारखी दिसणारी ट्रॉफी दिली जाते. ज्याला प्रतिकृती ट्रॉफी म्हणतात. यामागे एक किस्सा आहे, प्रत्यक्षात ट्रॉफी दोनदा चोरीला गेली आहे. एकदा ही ट्रॉफी हरवली तेव्हा एका कुत्र्याला ती सापडली. ट्रॉफी एका ठिकाणी कागदात गुंडाळलेली होती. सुरक्षेच्या दृष्टीने रिअल ट्रॉफीच्या जागी प्रतिकृती ट्रॉफी नंतर विजेत्या संघाला दिली जाते. स्पर्धेदरम्यान प्रतिकृती ट्रॉफी देखील ठेवली जाते. ट्रॉफी अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आणली जाते. ही ट्रॉफी स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आली आहे.