Ind vs Ban 1st Test: कुलदीप 20 महिन्यानंतर परतला अन् केली कमाल! अक्षरची लाभली साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Bangladesh 1st Test

Ind vs Ban 1st Test: कुलदीप 20 महिन्यानंतर परतला अन् केली कमाल! अक्षरची लाभली साथ

India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळल्या गेला. पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने बांगलादेशला ऑलआऊट करत सामना 188 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते.

या सामन्यात भारताकडून फलंदाजीत चेतेश्वर पुजारा हिरो ठरला, ज्याने पहिल्या डावात 90 आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याचबरोबर कुलदीप यादवने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test: भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी

सामन्यामध्ये काय घडलं ?

नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या. पुजारा 90, श्रेयस अय्यर 86 आणि रविचंद्रन अश्विन 58 धावा करून बाद झाले. पंत आणि कुलदीपनेही चांगले योगदान दिले. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 150 धावा करू शकला. मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 28 आणि मेहदी हसनने 25 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन बळी घेतले.

हेही वाचा: FIFA WC22: कोणाचे स्वप्न होणार साकार... तिसऱ्यांदा विश्वकरंडक उंचावण्यास अर्जेंटिना अन् फ्रान्स सज्ज

शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 258 धावा केल्या. पुजाराच्या शतकासह कर्णधार राहुलने डाव घोषित केला. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या खालेद अहमद आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने आपला दुसरा डाव 512 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 324 धावा करू शकला आणि 188 धावांच्या फरकाने सामना गमावला. बांगलादेशकडून झाकीर हसनने शतक, शाकिबने 84 आणि शांतोने 67 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने चार आणि कुलदीप यादवने तीन बळी घेतले. इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.