FIFA World Cup 2022 : फ्रान्सचा थाटात उपांत्य फेरीत प्रवेश! विश्वचषकात नवव्यांदा केला हा पराक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 France vs Poland France beat Poland 3-1 to reach quarter-finals

FIFA World Cup 2022 : फ्रान्सचा थाटात उपांत्य फेरीत प्रवेश! विश्वचषकात नवव्यांदा केला हा पराक्रम

FIFA World Cup 2022 : कतार येथे आयोजित करण्यात आलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये रविवारी रात्री प्री-क्वार्टर फायनलचा तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने शानदार खेळ करत पोलंडचा 3-1 असा दारून पराभव केला. या विजयासोबत फ्रान्स फुटबॉल विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरला आहे.

या सामन्यात किलियन एमबाप्पेने दोन गोल केले तर अनुभवी ऑलिव्हियर गिरौड याने एक गोल केला. फ्रान्स फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात नवव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये पोहचला आहे. तर पोलंडचे १९८२ नंतर अंतिम ८ मध्ये जाण्याचे स्वप्न भंग झाले आहे. दरम्यान पोलंडचा स्टार खेळाडू स्ट्राइकर आणि कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने या मॅचमध्ये पेनल्टी वर एक गोल केला.

हेही वाचा: Video : 'BJPकडून शेण खाण्याची परंपरा सुरूच'; दानवेंनी शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने NCP भडकली

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एकात पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी प्री-क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सचा सामना पोलंडशी झाला.

उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव केला होता. यावेळी अंतिम-8 मध्ये त्याचा सामना इंग्लंड किंवा सेनेगलशी होईल. हा सामना शनिवारी (१० डिसेंबर) होणार आहे. फ्रान्सचा संघ गेल्या वेळी चॅम्पियन ठरला होता. ती हळूहळू आपल्या विजेतेपद राखण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे.

हेही वाचा: Dehu Sansthan : शुभेच्छा देताना 'तुका म्हणे' वापरू नका, अन्यथा…'; देहू संस्थानाचा तरूणांना इशारा

टॅग्स :2022 FIFA World Cup