
Dehu Sansthan : शुभेच्छा देताना 'तुका म्हणे' वापरू नका, अन्यथा…'; देहू संस्थानाचा तरूणांना इशारा
पुणे : नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना तुका म्हणे हा शब्दप्रयोग वापरण्यावर देहू संस्थानचे ध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मिडीयावर शुभेच्छा देताना असा शब्दप्रयोग हमखास केला जातो आता हे करणे महागात पडू शकते. कारण कोणी शुभेच्छा देतान तुका म्हणे हा शब्दप्रयोग वापरताना दिसला तर यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देहूसंस्थानने दिला आहे.
तुका म्हणे हा शब्द शुभेच्छा देताना तसेच कमेंट करताना वापरला जातो. या पार्श्वभूमीवर तरुण वर्गातून संताच्या अभंगाची तोडमोड करून शुभेच्छा पत्र तयार केलं जाते असे संस्थानाचे म्हणणे आहे. 'तुका म्हणे' ही जगद्गुरू तुकाराम महाराज यांची नाममुद्रा आहे. थोडक्यात ती तुकाराम महाराज यांची स्वाक्षरी आहे.
हेही वाचा: Gujrat Election : 'मुस्लिम महिलांना तिकीट देणे हे…', जामा मशिदीचे शाही इमाम यांचं वादग्रस्त वक्तव्य
ज्या वाक्याला आपण 'तुका म्हणे' लावतो त्याला ते प्रमाण असतं. वारकरी सांप्रदायामध्ये ते खूप आदराचं नाम आहे. कोणीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल किंवा कोणत्याही संताच्या नावाचा वापर करून चुकीचे विडंबन करू नये. असं केलं तर देहू संस्थाच्या माध्यामतून कडक कारवाई केली जाईल असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आलं आहे
हेही वाचा: मोदींचं कॉंग्रेसबद्दल विधान अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी; आव्हाडांनी सांगितला किस्सा