युरोचा हिरो इटली सलग दुसऱ्यांदा FIFA World Cup साठी अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Italy fail to qualify for FIFA World Cup

युरोचा हिरो इटली सलग दुसऱ्यांदा FIFA World Cup साठी अपात्र

युरो कप स्पर्धेत हिरोवाली कामगिरी करणाऱ्या इटलीच्या संघाला वर्ल्ड कप पात्रता फेरीतील लढतीत मोठा धक्का बसला.य फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील नॉर्थ मॅकडोनियाने (North Macedonia) त्यांना पराभवाचा दणका दिला. या पराभवामुळे त्यांचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत प्रवेशाचा मार्ग बंद झाला आहे. सलग दुसऱ्यांदा इटलीच्या संघावर अशी नामुष्की ओढावली आहे. इंज्युरी टाइममध्ये North Macedonia ने 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी इटलीची गणितं बिघाडणारी ठरली. (Italy fail to qualify for FIFA World Cup)

हेही वाचा: घरकाम करणाऱ्या, चहा विकणाऱ्या पोरांचे आयुष्य बदलणारी आयपीएल

युरो कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये इटलीने जवळपास पाच दशकांची प्रतिक्षा संपुष्टात आणत दुसऱ्यांदा युरो ट्रॉफी जिंकली होती. युरोच्या इतिहासातील सर्वात जलद गोल डागत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या मिनिटाला आघाडी घेतली होती. पण सामना 1-1 बरोबरीत सोडवून इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूट आउटमध्ये पराभूत केले होते. इटलीच्या या कामगिरीनंतर वर्ल्ड कप स्पर्धेतही हा संघ पुन्हा दमदार कमबॅक करेल, असे संकेत मिळाले होते. पण आता पुन्हा एकदा इटलीच्या पदरी निराशा पडली आहे.

Web Title: Fifa World Cup 2022 Qualifiers Italy Fail To Qualify For Fifa World Cup For 2nd Straight Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..