घरकाम करणाऱ्या, चहा विकणाऱ्या पोरांचे आयुष्य बदलणारी आयपीएल

IPL Change Many Players Fortune
IPL Change Many Players Fortune esakal

आयपीएल (IPL) हा सगळा पैशाचा खेळ आहे असे मोघम वाक्य आपण कायम वापरतो. मात्र याच आयपीएलमुळे अनेक होतकरू खेळाडूंचे आयुष्याचे कल्याण झाले आहे. हातावरचे पोट असलेल्या कुटुंबातून आलेल्या खेळाडूंना आयपीएलने पैसा, प्रसिद्धी आणि आयुष्याला कलाटणी दिली. आपण अशाच आयपीएलमुळे आयुष्य बदलून गेलेल्या 5 खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत. (IPL Change Many Players Fortune)

पांड्या बंधू (Hardik Pandya Krunal Pandya)

हार्दिक पांड्याचे वडील व्यावसायिक होते. मात्र व्यवसायात त्यांना लॉस झाला. त्यामुळे घरची जबाबदारी हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यावर आली. त्यामुळे क्रिकेटर असणाऱ्या या पांड्या बंधूनंनी मिळेल ती स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळण्यास सुरूवात केली. पांड्या बंधूनी पैसे वाचवण्यासाठी मॅगीवर देखील दिवस काढले. मात्र 2015 ला हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून पहिली संधी मिळाली. तेथून या पांड्या बंधूंचे आयुष्यच बदलून गेले.

आयपीएलमध्ये 15 लाखापासून सुरूवात करणारा हार्दिक पांड्याने आता कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. हार्दिक पाठोपाठ त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याला देखील आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. सध्या या दोघे मिळून आयपीएलमध्ये वर्षाला 22 कोटी कमावतात. याचबरोबर आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे पांड्या बंधूंसाठी टीम इंडियाची दारे देखील उघडली होती.

IPL Change Many Players Fortune
IPL 2022 : पंत दोन 'हेड'मास्तरांचे आव्हान कसं झेलतो?

चेतन साकरिया (Chetan Sakariya)

ट्रक ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या चेतन साकरियाला राजस्थान रॉयल्सने 1.2 कोटी रूपयाला खरेदी केले आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. चेतन साकरियावर आर्थिक आणि भावनिक असा दोन्ही आघात झाले आहेत. चेनतचे वडील तीन अपघात आणि काही शस्त्रक्रियांमुळे फार काम करू शकत नाहीत. त्यातच त्याच्या भावाचे निधन झाले. मात्र घरच्यांनी सामने खेळण्यासाठी बाहेर गावाला असलेल्या चेतनला याची 10 दिवस माहिती दिली नव्हती.

ज्यावेळी साकरिया 19 वर्षाखालील संघाकडून खेळत होता. त्यावेळी त्याला एमआरएफ पेस फाऊंडेशनची स्कॉलरशिप मिळली होती. मात्र चेतनकडे शूज नव्हते. यावेळी शेल्डन जॅक्सनने आपल्याकडून शूज त्याला दिले होते. साकरियाने नेटमध्ये शेल्डनला बाद केले. साकरियाने राजस्थानकडून खेळताना पहिल्याच हंगामात दमदार पदार्पण केले.

IPL Change Many Players Fortune
Photos: धोनीने चाहत्यांना दिले 'हे' पाच धक्के

टी नटराजन (T Natarajan)

टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा टी नटराजन आयपीएल खेळला आणि त्याचे नशिबच बदलून गेले. पाच भावंडात सर्वात मोठा असलेला टी नटराजन कुटुंबासाठी कधी काळी वृत्तपत्र विक्री, दूध विक्री करण्याचे काम करत होता. याचबरोबर तो आपल्या गावात चहाचा टपरी देखील चालवत होता. 2011 मध्ये त्याला तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो रणजी खेळला. मध्यंतरी त्याच्या बॉलिंग अॅक्शनबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्याने आपली अॅक्शन सुधारून जोरदार पुनरागमन केले. आता तो आयपीएलमध्ये कोटींमध्ये खेळत आहे.

IPL Change Many Players Fortune
Women's IPL बाबत होणार 'चर्चा'; पाकने बाजी मारल्यानंतर BCCIला आली जाग

रिंकू सिंग (Rinku Singh)

केकेआरकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगचे वडील उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका एलपीजी वितरण कंपनीत काम करतात. रिंकूचा भाऊ आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी रिक्षा चालवतो. तर रिंकू घरकाम करून घरातील आठ सदस्यांचे पोट भरण्याचा प्रयत्न करत होता.

रिंकूने 10 वी नंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये गती घेतली. तो लवकरच उत्तर प्रदेशच्या संघात दाखल झाला. त्याने 2016 - 17 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 10 लाखाला खरेदी केले. मात्र 2018 च्या मेगा लिलावात केकेआरने रिंकूला 80 लाख रूपये देऊन आपल्या गोटात खेचले.

IPL Change Many Players Fortune
Video : शाब्बास! बोल्ड झाल्यावर वॉर्नरनं थोपटली अफ्रिदीची पाठ

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

भारताने ऑस्ट्रेलियात आस्ट्रेलियाला पराभूत केले. या मालिकेत एका नवख्या वेगवान गोलंदाजाने खूप नाव कमवले. तो म्हणजे मोहम्मद सिराज. रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या मोहम्मद सिराजने क्रिकेटमध्ये खूप नाव आणि सन्मान कमावला. कधीकाळी टेनिस क्रिकेट खेळणारा हा हैदराबादचा वेगवान गोलंदाज रणजी ट्रॉफीपर्यंत पोहचला आणि पहिल्याच हंगामात 9 सामन्यात 41 विकेट घेऊन प्रकाशझोतात आला. या कामगिरीनंतर सिराजसाठी आयपीएलची दारे उघडली. 2017 च्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादने सिराजला 2.6 कोटी रूपयाला विकत घेतले. त्यासाठी अनेक फ्रेंचायजींनी बोली लावली होती. त्याची बेस प्राईस 20 लाख होती. सिराजला क्लब मॅचसाठी 500 रूपये मिळत होते. आता आयपीएलमध्ये त्याच्यावर कोट्यावधी रूपयांचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com