FIFA World Cup: फुटबॉल विश्वचषकात अश्विन करणार 'या' संघाला सपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup

FIFA World Cup: फुटबॉल विश्वचषकात अश्विन करणार 'या' संघाला सपोर्ट

T20 विश्वचषक संपला आहे. 20 नोव्हेंबरपासून फिफा विश्वचषक सुरू होत असल्याने आता क्रिकेटमधील सर्व चाहते फुटबॉलकडे वळणार आहे. कतारमध्ये होणारा हा विश्वचषक हा अरब देशांमध्ये खेळला जाणारा पहिला फुटबॉल विश्वचषक असेल. फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान कतार आणि इक्वेडोरचे संघ आमनेसामने असतील.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

मात्र, सर्वांच्या नजरा मेस्सीच्या अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यावर असतील. फुटबॉल विश्वचषकाचा क्रिकेटपटूही मनसोक्त आनंद लुटतात. क्लब सामन्यांदरम्यान अनेक खेळाडूंनी स्टेडियमलाही भेट दिली. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हाही फुटबॉलचा मोठा चाहता आहे.

हेही वाचा: FIFA World Cup: कतारच्या 'या' 8 भव्य स्टेडियममध्ये रंगणार फुटबॉल वर्ल्डकप

एका वाहिनीशी बोलताना त्याने या फिफा विश्वचषकातील आपल्या आवडत्या संघाबद्दलही सांगितले. अश्विन म्हणाला- मी नेहमीच स्पेनचा चाहता आहे. या वर्षी ते कसे खेळतील याची खात्री नाही पण हो स्पेन कसे खेळेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. इतर फुटबॉल संघांनी खेळाचा स्तर उंचावला आहे आणि मागील विश्वचषक आश्चर्यकारक होता. फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेला गेल्या वेळी बघताना मला आनंद झाला. त्यामुळे मी अनेक नवीन स्टार्स पाहण्यास यावेळी उत्सुक आहे.

हेही वाचा: FIFA World Cup: कतारच्या 'या' 8 भव्य स्टेडियममध्ये रंगणार फुटबॉल वर्ल्डकप

मी FIFA विश्वचषक कतार 2022 ची वाट पाहत आहे. भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझानेही फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला- होय मी फिफा वर्ल्ड कप २०२२ पाहण्यासाठी कतारला जात आहे. मी पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे सामना पाहणार आहे. यामागे एकमेव कारण आहे ते म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. मी फुटबॉलचा मोठा चाहता आहे असे नाही, पण मला फक्त रोनाल्डोचा खेळताना पाहायचा आहे. ड्रीम फायनलबद्दल विचारले असता, प्रग्यान म्हणाला – मी फुटबॉलचा फारसा फॉलोअर नाही, पण जर मला निवड करायची असेल, तर मला अंतिम फेरीत मेस्सी विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणजेच अर्जेंटिना विरुद्ध पोर्तुगाल सामना पाहायला आवडेल.