

FIFA World Cup 2026
esakal
इंगलवूड (अमेरिका) : अमेरिका व इस्राईलविरुद्धच्या युद्धाचे पडसाद इराण संघावर फुटबॉल विश्वकरंडकात उमटत आहेत. इराणच्या संघाने या स्पर्धेमध्ये खेळण्याचा निर्णय घेत धाडस दाखवले; मात्र जी गटातील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडशी २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर त्यांना तत्काळ अमेरिका सोडण्यास सांगण्यात आले.
खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळही देण्यात आला नाही. तसेच फुटबॉल संघटनेचे अधिकारी, सहाय्यक स्टाफ व मीडिया प्रतिनिधी यांना व्हिसा न दिल्यामुळे इराणला या स्पर्धेदरम्यान मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.