fifa world cup : विश्वकरंडक स्पर्धेत सर्बीयाविरुद्ध लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil Team

fifa world cup : विश्वकरंडक स्पर्धेत सर्बीयाविरुद्ध लढणार

लुसेल (कतार) : सर्वाधिक पाच वेळा विश्‍वकरंडक उंचावणारा ब्राझीलचा फुटबॉल संघ अपेक्षेप्रमाणे यंदाही या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. ब्राझीलचा ज गटात समावेश असून या गटात सर्बीया, स्वित्झर्लंड व कॅमेरून या देशांचाही समावेश आहे. ब्राझीलची सलामीची लढत उद्या सर्बीयाशी होणार आहे. कागदावर ब्राझीलचे पारडे जड असले, तरी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभूत केल्यानंतर या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक आता बलाढ्य देश करणार नाहीत; तरीही ब्राझीलच्या खेळाकडे जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

सन २००२नंतर ब्राझीलला विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. त्यामुळे सहाव्यांदा विश्‍वविजेता होण्याचा दबाव त्यांच्यावर असणार, हे निश्‍चित आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये ब्राझीलच्या संघात १६ युवा खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पहिल्यांदाच विश्‍वकरंडकात सहभागी झाले आहेत. विनिशियस ज्युनियर, रॉड्रिगो, राफिना, एडर मिलिटाओ, ब्रुनो गिमरेस, अँथोनी या खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी यावेळी मिळणार आहे. विनिशियस याला ब्राझीलच्या अंतिम संघात स्थान देण्यात येईल की नाही, याबाबत मुख्य प्रशिक्षक टिटे यांनी मौन बाळगले आहे. अंतिम संघात स्थान दिल्यास तो नेमार, रिचर्लीसन व राफिना यांच्यासोबत आक्रमक फळीत खेळेल.

आजच्या ज गटातील लढती

स्वित्झर्लंड - कॅमेरून, अल वाकरा

दुपारी ३.३० वाजता

ब्राझील - सर्बीया, लुसेल

मध्यरात्री १२.३० वाजता