FIFA World Cup: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा इराणऐवजी इटली?; अमेरिकेकडून चाचपणी; पण विरोध होताच घूमजाव
Controversy Over Iran vs Italy World Cup Spot: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत इराणऐवजी इटलीला स्थान देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर वाद निर्माण झाला असून इटलीनेही ही कल्पना फेटाळून लावली आहे.
रोम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकारी येत्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेल्या इराण संघाऐवजी इटलीला संधी देण्यासाठी प्रयत्न करत असले तरी इटलीनेच विरोध करत ही शक्यता धुडकावली आहे.