Portugal vs Croatia FIFA World Cup 2026
esakal
Cristiano Ronaldo vs Luca Modric Football Marathi News: ४१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा होतोय की काय, अशी भीती प्रत्येक पोर्तुगाल फॅनच्या मनात घर करत चालली होती.. घड्याळाचे काटे पळत होते आणि धडधड वाढत गेली.. रोनाल्डोने बरोबरीचा गोल करून इतिहास घडवला, परंतु तो पुरेसा नव्हता... ९० मिनिटांचा खेळ संपला अन् सामना भरपाई वेळेत गेला... त्यात गोंझालो रामोसने ( GONCALO RAMOS) हेडरद्वारे अविश्वसनीय गोल करून पोर्तुगालला २-१ असा क्रोएशियावर विजय मिळवून दिला. पोर्तुगालचा संघ उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. पण, या निकालामुळे ४० वर्षीय लुका मॉड्रिच, या क्रोएशियन दिग्गजाची फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला...