FIFA World Cup Qualifier : ब्राझील - अर्जेंटिनीचा 'ती' स्थगित झालेली मॅच होणारच नाही

FIFA World Cup qualifier Brazil Vs Argentina Match Will Not Be Replayed
FIFA World Cup qualifier Brazil Vs Argentina Match Will Not Be ReplayedESAKAL

FIFA World Cup Qualifier Brazil Vs Argentina : गेल्या वर्षी फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडले होते. मात्र गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा सामना सुरू झाल्यानंतर काही मिनटातच स्थगित करण्यात आला. यावेळी ब्राझीलच्या आरोग्य अधिकाऱ्याने कोरोना विलगीकरणाच्या नियमांचा भंग झाल्याचे सांगत हा सामना स्थगित करायला लावला होता. आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांनी हा स्थगित झालेला पात्रता फेरीतील सामना पुन्हा होणार नसल्याचे सांगितले आहे.

FIFA World Cup qualifier Brazil Vs Argentina Match Will Not Be Replayed
Rohit Sharma: स्वातंत्र्यदिनी रोहित शर्माने केली मोठी चूक, चाहत्यांनी केले ट्विटरवर ट्रोल

ब्राझिलीयन फुटबॉल कान्फिडरेशन आणि अर्जेंटाईन फुटबॉल असोसिएशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात सांगितले की, 'ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील पात्रता फेरीतील स्थगित सामना पुन्हा होणार नाही. अर्जेंटाईन फुटबॉल असोसिएशन, ब्राझिलीयन फुटबॉल कान्फिडरेशन आणि फिफा यांनी क्रीडा न्यायालयातील त्यांचा वाद मिटवला आहे.' ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ यापूर्वीच कतार येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी पात्र झाले आहेत. 20 नोव्हेंबरपासून हा फुटबॉल वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.

दोन्ही देशांनी हा सामना आता खेळण्यात आला तर त्यांच्या वर्ल्डकप तयारीवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यात फिफाने हा सामना खेळवला गेला पाहिजे असे सांगितले होते. मात्र दोन्ही संघांनी त्याला नकार दिला. यामुळे या दोन्ही संघांना हजारो डॉलर्सचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण क्रीडा न्यायालयात (Court of Arbitration for Sport CAS) गेले.

FIFA World Cup qualifier Brazil Vs Argentina Match Will Not Be Replayed
Asia Cup 2022 : रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, मुंबईतील... - Video

दक्षिण अमेरिका पात्रता फेरी ग्रुपमधील या दोन्ही देशांनी काही सामने शिल्लक असतानाच वर्ल्ड कपची पात्रता फेरी पार केली होती. जरी स्थगित झालेला ब्राझील आणि अर्जेंटिना हा सामना पुन्हा खेळवला तरी त्याच्या निकालाने पात्रता फेरीच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाहीये. दक्षिण अमेरिका पात्रता फेरी ग्रुपमध्ये ब्राझील अव्वल स्थानावर आहे तर अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ फिफा वर्ल्ड कप 2022 साठी पात्र झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com