FIFA World Cup Qualifiers : छेत्रीविना भारतीय फुटबॉल संघ मैदानात उतरणार;फिफा विश्‍वकरंडक पात्रता फेरीत कतारशी लढत

दिग्गज खेळाडू सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ उद्या आशियाई खंडातील बलाढ्य कतारशी दोन हात करणार आहे.
FIFA World Cup Qualifiers
FIFA World Cup Qualifierssakal

दोहा : दिग्गज खेळाडू सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ उद्या आशियाई खंडातील बलाढ्य कतारशी दोन हात करणार आहे. फिफा विश्‍वकरंडकाची पात्रता फेरी सुरू असून अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढती मंगळवारी पार पडणार आहेत.

भारतीय फुटबॉल संघाला तिसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी कतारविरुद्ध विजय मिळवणे आवश्‍यक आहे. अ गटातून कतारने १३ गुणांसह पुढील फेरी गाठली आहे. भारताने कतारविरुद्धच्या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचाही मार्ग मोकळा होणार आहे, मात्र भारत-कतार ही लढत अनिर्णित राहिल्यास त्यांना अफगाणिस्तान-कुवेत या लढतीतील निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अफगाणिस्तान-कुवेत यांच्यामधील लढतही अनिर्णित राहिल्यास सरस गोलफरकाच्या जोरावर भारतीय संघाला आगेकूच करता येणार आहे, मात्र भारतीय संघ पराभूत झाला अन्‌ अफगाणिस्तानच्या संघाने विजय मिळवला, तर भारताचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे.

सुनीलनंतर कोण?

भारतीय फुटबॉल संघाला एक प्रश्‍न गेले दशकभर सतावत आहे. स्ट्रायकर सुनील छेत्रीनंतर कोण? सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतरही भारताचा अव्वल दर्जाचा आक्रमक फळीतील खेळाडू सापडलेला नाही. रहीम अली याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही. मानवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग, डेव्हिड एल. याचा आक्रमक फळीत समावेश केला जातो, पण त्यांनाही अद्याप चमक दाखवता आलेली नाही. भारतीय संघाला लवकरात लवकर सुनील छेत्रीचा उत्तराधिकारी शोधावा लागणार आहे.

अ गटातील सध्याची स्थिती

१) कतार - पाच सामन्यांमधून चार विजयांसह १३ गुण

२) भारत - पाच सामन्यांमधून एका विजयासह पाच गुण

३) अफगाणिस्तान - पाच सामन्यांमधून एका विजयासह पाच गुण

४) कुवेत - पाच सामन्यांमधून एका विजयासह चार गुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com