FIFA World Cup: फिफा विश्वचषकात खेळण्याचं भारताचं स्वप्न भंगलं? क्वालिफायरमध्ये कतारकडून भारताचा पराभव

भारतीय पुरुष फुटबॉल संघाला मंगळवारी कतार संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
FIFA World Cup: फिफा विश्वचषकात खेळण्याचं भारताचं स्वप्न भंगलं? क्वालिफायरमध्ये कतारकडून भारताचा पराभव

FIFA World Cup: भारतीय पुरुष फुटबॉल संघाला मंगळवारी कतार संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. कतार संघाने अ गटातील लढतीत भारतीय संघाला ३-० असे पराभूत केले. मात्र, फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याची भारताकडे संधी आहे. २०२६मध्ये होणार असलेल्या फिफा फुटबॉल विश्‍वकरंडकासाठी एएफसी आशियाई पात्रता फेरीच्या लढती सुरु आहेत.

भारतीय संघाकडून लढतीच्या सुरुवातीलाच चूक घडली. चौथ्या मिनिटाला कतारला गोल करण्याची संधी मिळाली. मुस्तफा मेशाल याने या संधीचा फायदा घेतला. त्याने कतारसाठी पहिला गोल केला. ३१व्या मिनिटाला मुस्तफाला दुसरा गोल करण्याची संधी होती. पण त्याला गोल करता आला नाही. त्यानंतर पूर्वार्धात कतारकडून १-० अशी आघाडी कायम ठेवण्यात आली.

कतारसाठी उत्तरार्धाची सुरुवातही दमदार झाली. ४६व्या मिनिटाला त्यांनी दुसरा गोल केला. मोईज अली याने हा गोल करीत कतारला पुढे नेले. ८६व्या मिनिटाला कतारने तिसरा गोल करीत भारताच्या उरल्यासुरल्या आशांना सुरुंग लावला. भारताचा अखेरचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. (Latest Marathi News)

FIFA World Cup: फिफा विश्वचषकात खेळण्याचं भारताचं स्वप्न भंगलं? क्वालिफायरमध्ये कतारकडून भारताचा पराभव
Pune News: पुण्यात बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमस्थळी हाणामारी; भक्त आणि स्वयंसेवक आपापसात भिडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com