FIFA World Cup : फिफाचे ट्रॉफी खरंच सोन्याची असते का भाऊ?

FIFA trophy made of real gold football
FIFA trophy made of real gold football
Updated on

FIFA World Cup : सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या विश्वकरंडकाचा महोत्सव आजपासून कतारमध्ये सुरू होत आहे. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेचे सर्व वातावरण भारून टाकणारे असणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभात 32 संघांमध्ये एकूण 64 सामने होणार आहेत. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायलियन एम्बापे आणि करिम बेन्झेमा अशा सुपरस्टार खेळाडूंसह इतरांचाही कौशल्यपूर्ण आणि लयबद्ध खेळ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

FIFA trophy made of real gold football
Pant-Urvashi : पंत-उर्वशीचं नेमकं नातं काय? टीम इंडियाच्या खेळाडूने केला मोठा खुलासा

यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणाऱ्या सलामीच्या सामन्याने स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. गतविजेते फ्रान्स, माजी विजेते ब्राझील यांच्यासह अर्जेंटिना, जर्मनी आणि इंग्लंड विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, परंतु कतारच्या उष्ण वातावरणाशी खेळाडू कसे जुळवून घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

FIFA trophy made of real gold football
IND vs NZ : दुसरा T20 सामना देखील होणार रद्द ? जाणून घ्या हवामान...

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजेत्या संघाला दिली जाणारी ट्रॉफी ही अत्यंत मौल्यवान असते. कारण यात 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. या ट्रॉफीची किंमत ही जवळपास 20 मिलियन डॉलर म्हणजेच भारताच्या रुपयानुसार 163 कोटी आहेत. ट्रॉफीमध्ये सोन्याच्या प्लेटसह चांदी आणि लापिस नावाच्या मौल्यवान खडकाचा वापर केला आहे. या ट्रॉफीची उंची 14 इंच (37 सेंटीमीटर) इतकी असते. तर वजन 6 किलोग्रॅम. या ट्रॉफीवर दोन व्यक्तींनी पृथ्वी उचलून धरल्याचा आकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com