IND vs NZ : दुसरा T20 सामना देखील होणार रद्द ? जाणून घ्या हवामान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand 2nd T20I Weather Forecast

IND vs NZ : दुसरा T20 सामना देखील होणार रद्द ? जाणून घ्या हवामान...

India vs New Zealand 2nd T20I Weather Forecast : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी आज होणार आहे. माउंट माउंगानुई येथे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे. वेलिंग्टनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडण्याची भीती चाहत्यांना आहे. माउंट माउंगानुई येथे आता जोरदार पाऊस सुरू आहे.

हेही वाचा: BCCI Selection Committee : टीम इंडियाचे सिलेक्टर व्हायचंय; ही आहे BCCI ने दिलेली कामांची लीस्ट

हवामानाच्या अंदाजानुसार, दुसऱ्या टी-20 सामन्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. असे झाल्यास हा सामनाही पावसामुळे रद्द होईल. माउंट माउंगानुई येथे तापमान 15-21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. AccuWeather नुसार, दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. सकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे, जो दुपारपर्यंत जोरदार होईल.

हेही वाचा: NZ vs IND 2nd T20 : 'ही' असेल टीम इंडियाची Playing 11; मात्र पाऊस पुन्हा खेळ बिघडवू शकतो

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता माउंट माउंगानुई येथे सामना सुरू होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. सायंकाळी चारच्या सुमारास पावसाचीही शक्यता आहे. त्यानंतर सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.