Asia Cup IND vs AFG : भारत - अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबई स्टेडियममध्ये लागली आग

Dubai International Stadium IND VS AFG
Dubai International Stadium IND VS AFGesakal
Updated on

India vs Afghanistan Asia Cup 2022 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 4 मधील सामना काही वेळातच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामुळे भारत अफगाणिस्तान सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होण्याची शक्यता आहे. (Fire Broke Out In Dubai International Stadium Before India vs Afghanistan Asia Cup 2022 Super 4 Match)

Dubai International Stadium IND VS AFG
दिल्ली कॅपिटल्सचा माजी क्रिकेटपटू वादात; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

भारत आणि अफगाणिस्तान आधीच आशिया कप फायनलच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. आज हे दोन्ही संघ आशिया कपमधील आपला शेवटचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आशिया कपची सांगता ही विजयाने करण्यास उत्सुक आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन टी 20 सामने झाले आहेत. यातील तिनही सामने भारताने जिंकले आहेत.

Dubai International Stadium IND VS AFG
Asia Cup 2022 : पाकिस्तान - अफगाण राड्यानंतर रमीझ राजा करणार ICC कडे तक्रार

मात्र आजच्या सामन्यातील चित्र थोडेसे वेगळे असणार आहे. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरूद्धचे सामने गमावले आहेत. तर अफगाणिस्ताने ग्रुप स्टेजमधील आपले दोन्ही सामने जिंकून सर्वात प्रथम आशिया कपची सुपर 4 फेरी गाठली होती. कालच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला फेस आणला होता. अफगाणिस्ताने पाकिस्तानसमोर फक्त 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान पार करताना पाकिस्तानचे 9 फलंदाज बाद झाले होते आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com