
Pillow Fighting मध्ये तरबेज असाल तर मिळेल साडे तीन लाखांच बक्षीस
नवरा बायकोमधील भांडणात अनेक हत्यारं वापली जातात. मात्र त्यातील सर्वात फेसम हत्यार असतं ते म्हणजे उशी. (Pillow Fight) अनेक नवरे तर बायकोच्या उशीद्वारे केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी तरबेज असतात. तर काही बायकांचा नेम इतका भारी असतो की नवऱ्याचा डिफेन्स कितीही चांगला असला तरी तो त्या भेदतातच! (First Pillow Fighting World Championship Conducted in Florida)
हेही वाचा: विराटच्या 'या' निर्णयाचा मला धक्काच बसला : पाँटिंग
अशा उशी घेऊन भांडण्याचे कौशल्य आत्मसात केलेल्या अनेकांसाठी आता या जोरावर पैसे कमावण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये उशीद्वारे भांडण्याला (Pillow Fighting) नुकतेच व्यावसायिक रूप देण्यात आले आहे. फ्लोरिडामध्ये नुकतीच जगातील पहिली उशीद्वारे लढत (Pillow Fighting World Championship) होणारी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १६ पुरूष आणि ८ महिलांनी सहभाग नोंदवला होता. या Pillow Fighting मधील विजेत्याला ५ हजार अमेरिकी डॉलर्सचे (३ लाख ७२ हजार रूपये) बक्षीस देण्यात आले.
हेही वाचा: U-19 World Cup : विश्वचषकात पाकिस्ताननं बांगलादेशला चारली धूळ
या स्पर्धेत खेळाडू एका बॉक्सिंग रिंगमध्ये लढतात. मात्र त्यांच्या हातात ग्लोजच्या ऐवजी स्पर्धेसाठी तयार केलेली विशेष उशी दिली होती. अनेक खेळाडू हे मार्शल आर्टमध्ये तरबेज असल्याने त्यांनी या उशीद्वारे खेळताना आपल्या मार्शन आर्टचा पुरेपूर वापर केला. या स्पर्धेत महिलांमध्ये ब्राझीलच्या अस्तेला न्युनेसने (Istela Nunes) विजेतेपद पटकावले. तर अमेरिकेच्या हॉली ट्युलमनने (Hauly Tillmen) पुरूषांचे विजेतेपद पटकावले.
Web Title: First Pillow Fighting World Championship Happened In Florida
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..