U-19 World Cup : विश्वचषकात पाकिस्ताननं बांगलादेशला चारली धूळ

U-19 World Cup
U-19 World Cupesakal
Summary

पाकिस्ताननं बांगलादेशचा डाव 175 धावांत गुंडाळला.

U-19 World Cup : वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) सुरू असलेल्या ICC अंडर-19 विश्वचषक (Under 19 World Cup) 2022 मध्ये सोमवारी तीन सामने खेळले गेले. ज्यात पाकिस्तान, UAE (United Arab Emirates) आणि वेस्ट इंडिजचे संघ आपले सामने जिंकण्यात यशस्वी ठरले. पहिल्या सामन्यात प्लेऑफच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी (Bangladesh) झाला. या सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केलाय. उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून (Australia), तर बांगलादेशला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्ताननं (Pakistan) बांगलादेशचा डाव 49.2 षटकांत 175 धावांत गुंडाळला. अरिफुल इस्लामच्या (Ariful Islam) शतकानंतरही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इस्लामनं 119 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत 100 धावा केल्या. तो सामनावीर ठरला. त्याच्याशिवाय इफ्तेखार हुसेननं 25 आणि एसएम मेहराबनं 14 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून अवैस अली आणि मेहरान मुमताज यांना प्रत्येकी तीन विकेटस् मिळाले.

U-19 World Cup
WI vs ENG: होल्डरचा विक्रमी चौका; 4 चेंडूत 4 विकेट्स (VIDEO)

पाकिस्ताननं 176 धावांचं लक्ष्य 46.3 षटकात पूर्ण केलं. फलंदाज हसिबुल्लाह खाननं 107 चेंडू, 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 79 धावा केल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद शहजादनं 36 आणि इरफान खाननं 24 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार रकीबुल हसननं दोन बळी घेतले. अन्य एका सामन्यात यूएईनं प्लेट फायनलमध्ये आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव करून इतिहास घडवला. आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा संपूर्ण संघ 122 धावांत आटोपला. यूएईचे गोलंदाज ध्रुव पाराशर, अली नसीर, आदित्य शेट्टी, जश यांनी चांगली कामगिरी केलीय. UAE ने 144 चेंडू राखून दोन विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. यूएईचा सलामीवीर काई स्मिथ 49 धावांवर बाद झाला, तर पुण्य मेहरा 48 धावांवर नाबाद राहिला. यासह यूएईनं प्लेट फायनलमध्ये सहज विजय मिळवलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com