Flying Race Car : आता आकाशात होणार फॉर्म्युला वन रेसिंग; जाणून घ्या सर्वकाही

जगभरात फॉर्मुला वन रेसिंगचे करोडो चाहते आहेत.
Flying Race Car
Flying Race Car Sakal

Flying Race Car : जगभरात फॉर्मुला वन रेसिंगचे करोडो चाहते आहेत. आतापर्यंत तुम्ही फॉर्मुला वन जमीनीवर पाहिली असेल. मात्र, जर येथून पुढे ही रेसिंग जमीनीवरनव्हे तर, आकाशात होणार आहे, असे जर सांगितले तर, तुमचा विश्वास बसणार नाही ना?

Flying Race Car
US Embassy : लंडनमध्ये यूएस दूतावासात संशयास्पद वस्तू; रिकामे करण्यात आले कार्यालय

मात्र, आता अशी एक रेसिंग कार सादर करण्यात आली आहे जी आकाशात उडू शकते. आज आपण याच सादर करण्यात आलेल्या फ्लाइंग रेसिंग कारबद्दल माहिती सांगणार आहोत.

Flying Race Car
Prisoner : कैद्यांसाठी मोठी बातमी! आता तुरुंगात मिळणार 'या' सुविधा

एअरस्पीडर कंपनीने MK4 रेसिंग कार सादर केली आहे. ही कार ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये डिझाइन आणि तयार करण्यात आली आहे. ही कार म्हणजे जगातील सर्वात वेगवान हायड्रोजन इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग विमान असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Flying Race Car
IPL 2023 Telecast : अंबानी फ्री मध्ये दाखवणार IPL, मोजली मोठी रक्कम, इथे पाहता येणार मोफत सामने

या कारमध्ये बसवण्यात आलेली मोटार 1340 इतकी पॉवर निर्माण करते. ही कार केवळ 30 सेकंदात 360 किमी प्रतितास वेगाने धावते. हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाने या कारची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. एकावेळी ही कार ३०० किमीचा पल्ला गाठू शकते.

Flying Race Car
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

ही कार प्रथमदर्शनी सामान्य फॉर्म्युला वन रेसिंग कारसारखी दिसते. यात फॉर्म्युला वनच्या तुलनेत चार प्रोपेलर बसवण्यात आले आहे. ज्यामुळे ही कार टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. कारच्या मागील बाजूस फायटर जेटसारखे इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय, यात फॉर्म्युला वन कारप्रमाणेच फक्त एका व्यक्तीची बसण्याची जागा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com