Fifa World Cup 2022: वर्ल्डकपचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेंटिनासाठी वाईट बातमी, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fifa World Cup 2022

Fifa World Cup 2022: वर्ल्डकपचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेंटिनासाठी वाईट बातमी, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

कतार : अर्जेंटिनाच्या संघाकडून आक्रमक फळीत खेळणाऱ्या निकोलस गोन्झांलेझला सरावादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागल्यामुळे तो कतारमधील विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही त्याला बाकावर बसवण्यात आले होते. अर्जेंटिना संघाचा विश्वकरंडकासाठी सराव चालू असताना त्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याने तो बाहेर पडला असून; त्याच्या जागी अटलांटिक माद्रिदकडून खेळणाऱ्या अँजेल कोरियाची अर्जेंटिनाच्या संघात निवड करण्यात आली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना अर्जेंटिनाच्या फुटबॉल प्रशासनाकडून सांगण्यात आले की, ‘‘मोठी स्पर्धा म्हटले की दुखापतींचा सामना संघाला करावाच लागतो. संयुक्त अरब अमिरातीवरील विजयासह आमच्या संघाची विजयी मालिका ३६ पर्यंत पोहचली आहे.’’